Categories: करमाळा

तपश्री प्रतिष्ठान गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शिबीर संपन्न

करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 27-8-2023  रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रसिद्ध आडत व्यापारी नवनाथजी सोरटे , मकाईचे नूतन संचालक अमोल आबा यादव ,सामाजिक कार्यकर्ते विजयराव लावंड , नगरसेवक सचिन घोलप , भाजप चे जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, पप्पूजी उकिरडे,अभिजित दोशी, संतोष किरावे, संतोष दोशी, महेश दोशी, मिलिंद दोशी, गो सेवा समितीचे सदस्य- जगदीश शिगाजी, नितीन दोशी, दिनेश मुथा, वैभव दोशी यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर म्हणाले की आतापर्यंत सुमारे 4500 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना अध्यक्ष नवनाथ जी सोरटे यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. जमीलभाई काझी यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.भाजप नेते विठ्ठलराव भणगे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले.आजच्या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या प्रसंगी मकाई सहकारी साखर कारखाना च्या नूतन संचालक पदी निवड झाल्या बद्दल अमोल आबा यादव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी संतोष भांड , चंद्रकांत काळदाते , विजय बरीदे ,गिरीश शहा कृष्णराज खंडागळे यांच्या सह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले… तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले..

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago