Categories: करमाळा

पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीचा थांबा चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान ब्रीज इतर विकास कामांविषयी ग्रामस्थांना खासदार निंबाळकर यांचे आश्वासन-ॲड अजित विघ्ने

केत्तुर प्रतिनिधी  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समवेत आज उजनी रेस्ट हाऊसवर महत्वपुर्ण बैठक पार पडली, यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुर्यकांत भाऊ पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक राजेंद्रसिंह पाटील, केत्तुर व्यापारी संघाचे अध्यक्ष राजुशेठ कटारिया, माजी सरपंच ॲड, अजित विघ्ने, विलास सोनवणे, पंडीतराव माने व ग्रामस्थ शिष्ट मंडळ उपस्थित होते. या वेळी पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीचा थांबा आणि चांडगाव ते पोमलवाडी दरम्यान ब्रीज व इतर अनेक विकास कामांविषयी चर्चा झाली. यावेळी खासदार निंबाळकर यांनी मी केम, जेऊर नंतर आता पारेवाडीला एक एक्सप्रेस गाडीचा थांबा लवकरच मंजुर करून देणार असले बाबत ठोस आश्वासन दिले असुन, पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान चा पुल झाल्यास मराठवाडा चे पश्चिम महाराष्ट्र दरम्यान होणारे कनेक्शन आणि त्याचे मुळे होणारा सर्वांगिन विकास याबाबत सविस्तर चर्चा केली व लागलीच संबंधित अधिकारी वर्गाला स्थळपहाणी करणे बाबत व प्रस्ताव तयार करणे बाबत च्या सुचना दिलेल्या आहेत. फलटण- नातेपुते- वालचंदनगर- कळस- लोणी देवकर ते चांडगाव- पोमलवाडी ते राशीन/ करमाळा मार्गे मराठवाड्या शी कनेक्शन होणारा हा मार्ग झाल्यास बायपास रस्त्यासह नवीन मार्ग होण्यासाठी प्रयत्न करणार असले बाबत सांगितले आहे. लवकरच या ठिकाणी अधिकारी वर्गा बरोबर पाहणी दौरा होणार असुन करमाळा तालुक्याचे विकासाला चालना देण्यासाठी या महत्वपुर्ण कामांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे शिष्टमंडळाने व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

8 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago