करमाळा प्रतिनिधी पवित्र श्रावण मासानिम्मित करमाळा शहरातील किल्ला वेस येथील राजेरावरंभा काळातील खोलेश्वर महादेवाची रथ यात्रा मिरवणूक श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी करमाळा शहराच्या प्रमुख मार्गावरून जात असुन रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून करमाळा नगरपालिकेने रस्त्याची खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी करमाळा नगर परिषदेकडे केली आहे. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा शहरातील आराध्य दैवत असलेल्या खोलेश्वर महादेवाची रथ यात्रेची मिरवणूक करमाळा शहरातून भव्यदिव्य मोठ्या उत्साहात निघत असते. सदर रथ भाविक भक्त ओढून नेत असतात. अशा परिस्थितीमध्ये करमाळा शहरातील रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त खड्डे असल्यामुळे रथयात्रेला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून महादेव रथाची यात्रा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कमळा नगर परिषदेने ताबडतोब खड्डे बुजून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोंबकळत असणाऱ्या वीजेच्या तारा या रस्त्याच्या मार्गावरून असल्याने याचा बंदोबस्त करावा जेणेकरून कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन काम करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी दिला आहे.