महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. सदर योजनेअंतर्गत करमाळा नगरपरिषद व कुर्डूवाडी नगरपरिषद या 2 नगरपरिषदांना 10 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दिनांक 24 ऑगस्ट 2023 व 29 ऑगस्ट 2023 च्या शासन निर्णयानुसार सन 2023 – 24 लेखाशीर्ष (42 17 0603) अंतर्गत करमाळा व कुर्डूवाडी या नगरपरिषदांना विविध विकास कामांसाठी 10 कोटी निधी मंजूर झालेला आहे. करमाळा येथे या निधीमधून करमाळा शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालये सिमेंट रस्त्याने जोडली जाणार आहेत.तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, महिला व बालविकास विभाग इत्यादी कार्यालयांना जोडणारे रस्ते सिमेंट काँक्रीट करणे या कामासाठी 1 कोटी, करमाळा बस स्टॅन्ड ते पवार हॉस्पिटल राशीन रोड रस्ता सिमेंट काँक्रेट करणे -30 लाख ,बायपास रोड ते साई कॉलनी गजानन नगर रस्ता सिमेंट काँक्रेट करणे व भूमिगत गटार यासाठी 50 लाख, बायपास रोड ते जयवंतराव जगताप घर रस्ता कॉंक्रिटीकरण व भूमिगत गटार -30 लाख, मौलाली माळ येथे दफनभूमी, पाणीपुरवठा करणे, पेविंग ब्लॉक बसविणे ,संरक्षक भिंत बांधणे व इतर सुविधांसाठी -20 लाख ,सिद्धार्थ नगर येथील ख्रिश्चन भूमी येथे प्रार्थना मंदिर बांधणे पाणीपुरवठा करणे पेविंग ब्लॉक बसविणे यासाठी 20 लाख , सावंत गल्ली येथे नगरपालिका जागेत तालीम बांधणे 20 लाख, माजी सैनिक कल्याणकारी संस्था कारगिल भवन बांधणे 20 लाख, सावंत वस्ती ते हवालदार वस्ती रस्ता खडीकरण व पूल बांधणे 15 लाख ही कामे केली जाणार आहेत.
तर कुर्डूवाडी येथे प्रभाग एक ,दोन ,तीन, चार व पाच येथे उद्यान शुशोभीकरण करणे ,रस्ता सिमेंट काँक्रीट करणे ,खडीकरण करणे ,स्ट्रीट लाईट बसविणे, हिंदू स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, बेंद ओढ्यावर पूल बांधणे, स्मशानभूमी रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, भुयारी गटार बांधणे, पेविंग ब्लॉक बसविणे, बेंद ओढ्या पर्यंत कॅनॉल गटार करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…