मकाई सहकारी साखर कारखाना ऊस बिलासाठी 6 संप्टेबर रोजी साखर आयुक्त पुणे येथे हलगीनाद बेमुदत धरणे आंदोलन- प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी या साखर कारखान्यांने शेतकऱ्याची ऊस बिले न दिल्याने या कारखान्याविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन साखर आयुक्त पुणे कार्यालय येथे करण्यात येणार असल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी दिली आहे. याबाबतचे पत्र साखर आयुक्त पुणे यांना ई-मेल द्वारे पाठवण्यात आलेली आहे या ईमेल पत्रा मध्ये प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी असे म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी पो.जिंती.करमाळा या साखर कारखान्याने सन 2022- 23 गाळप शेतकऱ्याचे ऊस बिल अद्याप पर्यंत दिलेले नाही. आपणास व कारखान्यास याबाबत वारंवार कळून देखील शेतकऱ्यांना बिल अद्यापही दिले मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. करमाळा तालुक्यामध्ये पाऊस नसल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे .अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बिल मिळणे गरजेचे आहे शेतकऱ्यांच्या बिलासाठी सहा सप्टेंबर रोजी हलगीनाद करून धरणे आंदोलन साखर आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे या पत्रावर प्राध्यापक रामदास झोळ सर कामगार नेते दशरथ अण्णा कांबळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद देवकते यांच्या सह्या असून शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागणीसाठी धरणे आंदोलन करण्याची भूमिका घेऊन या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होऊन शेतकऱ्यांचे ऊस बिल मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी संघटना शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत. यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे सदर निवेदनाच्या प्रति सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी सोलापूर तहसीलदार करमाळा मकाई सहकारी साखर कारखाना यांना पाठवण्यात आले असून सहा सप्टेंबर रोजी शेतकऱी ऊस बिलासाठी साखर आयुक्त पुणे येथे हलगीनाद बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा प्राध्यापक रामदास झोळसर यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago