Categories: करमाळा

करमाळा तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करा आढावा बैठकीत आमदार संजयमामा शिंदे यांनी केल्या सूचना

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात पाऊस लांबल्यामुळे दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच संभाव्य चारा टंचाई व पाणी टंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना मदत, तलावातील गाळ काढणे आदींचा आढावा घेण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी तहसील कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत संभाव्य दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली असून आवश्यक त्या ठिकाणी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवा, मीही सरकारकडे मदतीसाठी पाठपुरावा करतो, असे आश्वासन त्यांनी दिले.
करमाळा तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. ३१) झालेल्या बैठकीवेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, समाधान घुटुकडे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, कृषी अधिकारी संजय वाकडे, प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, मंडळ अधिकारी संतोष गोसावी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उध्दव माळी, वामनराव बदे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, अॅड. राहुल सावंत, विवेक येवले आदी उपस्थित होते.
पाऊस लांबल्यामुळे तालुक्यात दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. या बैठकीत तलावातील गाळा काढण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्यासाठी शेतकऱ्यांनाही आवाहन करण्यात आले आहे. टँकर सुरु करण्याची वेळ आल्यास पाणी भरण्यासाठी ठिकाणे निश्चीत करा, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली आहे. याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन कसे करता येईल, यावरही यावेळी चर्चा झाली. नागरिकांना रोजगार कसा मिळाले त्यासाठी काय कामे केली पाहिजेत, पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसी करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

13 mins ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

20 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

23 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago