करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामस्थ व शिवभक्ताच्या वतीने बसवण्यात आला आहे.सदर पुतळा नियमित करून शिवभक्तांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रशासनामार्फत सहकार्य करण्याबाबतचे निवेदन प्रा.रामदास झोळ यांनी सोलापुर पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांना दिले आहे.सदर दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा काढण्यासाठी प्रशासन वारंवार नोटीस देऊन ग्रामस्थ व शिवभक्तावर दबाव आणत आहे. वास्तविक पाहता पुर्वी ज्या जागी अर्धा कृती पुतळा होता त्याच ठिकाणी अश्वारूढ पुतळा बसवला आहे. शेटफळ येथील नागरिक व शिवभक्त व करमाळा तालुक्यातील तमाम शिवभक्तांच्या भावनांचा विचार करून सदर पुतळा हलवण्याचा प्रशासनाचा विचार मोठ्या प्रमाणात समाजामध्ये तेढ निर्माण करणारा होऊ शकतो. त्यामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटून अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे सदर बाबींचा गांभीर्याने विचार करून शेटफळ येथील ग्रामस्थ व शिवभक्तांच्या भावनांचा विचार करून आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा नियमित करण्यात यावा अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सोलापूर पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्याकडे केली आहे.सदर निवेदन देताना प्रा.रामदास झोळ काॅंग्रेस ओबीसी तालुकाध्यक्ष गफुर शेख विष्णू वाघमोडे कार्यकर्त उपस्थित होते.