करमाळा प्रतिनिधी – शिवसेना नेते,नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते.दरवर्षीप्रमाणे करमाळा शहर महास्वच्छता अभियान राबवून शहरातील सफाई सुरु आहे. श्री.कमलाभवानी मंदिरात वैभवराजे जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.त्यानंतर येथील मूकबधिर विद्यालयात वाढदिवसानिमित्त जेवण देण्यात आले.तसेच एकलव्य आश्रम शाळेत देखील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले.दिव्यरत्न गोशाळेतील मुक्या जनावरांना हिरवा चारा वाटप करण्यात आला.
दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात देशभक्त कै.नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर करमाळा शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने येऊन वैभवराजे जगताप यांना शुभेच्छा दिल्या.संध्याकाळनंतर शहरातील फंड गल्ली,कानाड गल्ली,कुरेशी गल्ली रंभापूरा ,भीमनगर, सिद्धार्थ नगर, खाटीक गल्ली ,चालक मालक संघ,सुभाष चौक,मौलाली नगर यासह प्रत्येक प्रभागात वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी,अस्लम वस्ताद कुरेशी नजीर अहमद कुरेशी, प्रशांत ढाळे, बाळासाहेब बलदोटा ॲड नवनाथ राखुंडे,डाॅ.मनोज कुंभार, श्रेणीक खाटेर, अमोल परदेशी,सुनिल ढाणे, गणेश कुकडे, जोतिराम ढाणे ,बाळासाहेब कांबळे, युवा सेनेचे मयुर यादव, समीर हलवाई, दादा धाकतोडे,वंचित बहुजन आघाडीचे पप्पू लोंढे ,संभाजी होनप, जगदिश परदेशी, रोहिदास आल्हाट हे मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरबाज लालू घोडके,ओंकार आल्हाट,तानाजी कुकडे,उत्तम कांबळे, अमीर घोडके ,अक्षय जाधव, केतन इंदूरे ,सुशांत इंदुरे ,अतुल देवकर, सर्जेराव मांगले ,सूरज इंदुरे, बाळा इंदुरे, विनोद कुकडे ,कुमार माने,रणवीर परदेशी,फराज काझी यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…