करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील युवा एकलव्य प्रतिष्ठान, एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा यांच्या वतीने एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेचे अध्यक्ष, भटक्या जमाती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात साठ वृक्षांचे रोपण करण्यात आले. तर रक्तदान शिबिरात साठ जणांनी रक्तदान केले.
तीस ऑगस्टला समाज कल्याण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी गोपाळराव सावंत, आश्रमशाळेचे अध्यक्ष रामकृष्ण माने, स्वातीताई माने, युवा एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. संग्राम माने यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. बाबुराव हिरडे हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी हिरडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, डॉ. प्रदीपकुमार जाधव-पाटील, प्रा. नागेश माने, प्रा. अभिमन्यू माने, माजी नगराध्यक्ष दीपकराव ओहोळ, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, डॉ. श्रीराम परदेशी, पत्रकार विवेकराव येवले, भारत जाधव, सचिन साखरे, बाळासाहेब गोरे, विजय देशपांडे, पोलीस अधिकारी बिभीषण जाधव, पत्रकार अशपाक सय्यद, शकील बागवान, उद्योजक कुलकर्णी, शिक्षक बापूराव भगत, युवा नेते धनंजय शिंदे, वृक्षमित्र काकासाहेब काकडे, अरुण माने, सोपान माने, धनंजय माने, शिवाजीराव माने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब झिंझाडे, प्रा. कोळेकर आदिंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. हिरडे यांनी, प्रतिकूल परिस्थितीतून माने यांनी केलेली वाटचाल आणि उभारलेले सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण उपक्रम राबवून वृक्ष संवर्धनचे केलेले नियोजन अनुकरणीय आहे असे सांगितले. याप्रसंगी पत्रकार विवेकराव येवले, प्रा. अभिमन्यू माने, बाळासाहेब गोरे यांनी मनोगते व्यक्त केली.
तर एकतीस ऑगस्टला आयोजित रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, फिजिओथेरपी शिबीराचे उदघाट्न माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. तानाजीराव जाधव, नगरसेवक संजय सावंत, डॉ. रोहन पाटील, डॉ. बाबुराव लावंड, डॉ. तुषार गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या राणीताई वारे, फारुख जमादार, फारुख बेग, नगरसेवक प्रविण जाधव, विनय ननवरे, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. सुनिल घोलप, सुभाषराव जाधव, प्रा. अभिमन्यू माने, पत्रकार विशाल घोलप, दिनेश मडके, नरेंद्रसिंह ठाकूर, पोलीस अधिकारी बिभीषण जाधव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, रामदास जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे, जेष्ठ कुस्तीपटू सोपानभाऊ माने, प्रकाश माने, हनुमंत माने, बिलाल मदारी, राशीन भाजप युवा आघाडीचे विजय साळवे, राशीन युवक क्रांती दलाचे अध्यक्ष विनोद सोनवणे आदि उपस्थित होते.
यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधी आणि उपस्थितांच्या वतीने माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना देवी यांनी, माने यांचे सामाजिक कार्य प्रभावी आहे. तळागाळातील समाजासाठी ते करत असलेले काम आदर्श आहे. असे सांगितले. तर सन्मानाला उत्तर देताना माने यांनी, यापुढील काळातही वंचित समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले. सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी प्रशांत भोसले, जमीर शेख, माँटी वाडे, पूनम डोलारे, साधू जगताप यांनी परिश्रम घेतले. तसेच याप्रसंगी आरोग्य शिबिरात डॉ. गणेश राऊत, डॉ. राहूल जाधव यांनी सेवा दिली. तर फिजिओथेरपी शिबिरात डॉ. अक्षय अडसूळ यांनी मार्गदर्शन करुन सेवा दिली. या शिबिराचा दोनशे तीस जणांनी लाभ घेतला.
उपस्थितांचे स्वागत स्वातीताई माने, क्रांती माने यांनी केले. आभार युवा एकलव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. संग्रामदादा माने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा शिक्षक, कर्मचारी वर्ग आणि युवा एकलव्य प्रतिष्ठानचे सदस्य यांनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने सांगता करण्यात आली.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…