करमाळा प्रतिनिधी मराठा समाज सहिष्णू असून सर्व जाती-धर्मियांना बरोबर घेऊन काम करणारा असून समाजामध्ये सर्व समाजाला दिशा देणारा आहे जातीय सलोखा राखून इतर समाजाचा पोशिंदा म्हणून या समाजाने आज पर्यंत काम केले असून सर्व समाजाचे कल्याण करणारा हा समाज आरक्षण नसल्यामुळे विकासाच्या प्रवाहापासून वंचित या समाजाला आरक्षण न देता या समाजावर बेछुटपणे लाठी चार्ज करणारे हे सरकार मराठाविरोधी सरकार असल्याचे मत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी व्यक्त केले.सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे प्र.तहसीलदार विजय जाधव यांना समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले. जालना येथील मराठा आंदोलकावर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून करमाळा येथील बायपास चौक येथे रविवारी सकाळी दहा वाजता भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत असून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळामध्ये बारा बलुतेदार अठरा पगड जातींना न्याय देण्याचे काम केले त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असणारे स्वराज्य निर्माण केले .त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज मराठा बांधवाबरोबरच बहुजन बांधवांचे आराध्य दैवत आहे.त्यांचे वारस म्हणून मराठा समाजाने आतापर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेतून सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचे काम केले. सर्वांचा पोशिंदा असणारा मराठा समाज सध्या अत्यंत बिकट परिस्थितीतून जीवन जगत आहे.शेती मोलमजुरी करून जीवन जगत आहे. या समाजातील पाच दहा टक्के लोक गडगंज श्रीमंत असल्याकारणाने त्यांना आरक्षणाची गरज नाही. मराठा समाजातील पुढार्यांना केवळ राजकारणापुरती मराठा समाजाची मते मातापुरते समाजाचे राजकारण करण्याचे काम केले आहे. आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा समाजाला दारिद्र्याच्या खाईत लोटण्याचे काम राजकीय मंडळींनी केले आहे त्यामुळे आता आरक्षणाशिवाय पर्याय नाही आज पर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले आहे सर्व जगाने या मराठा क्रांती मोर्चाचे कौतुक केले आहे .अशा परिस्थितीत जालना सराटा जालना येथील मराठा समाज बांधव आरक्षणासाठी शांततेने आंदोलन करत असताना ते आंदोलन दडपण्यासाठी लाठी चार्ज करून मराठा समाजावर मोठा अन्याय करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे आता या लोकांना सरकारला मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा शांततेच्या मार्गाने हा लढा चालू राहणार आहे. करमाळा शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार असून सहा सप्टेंबर रोजी महात्मा गांधी पुतळा पोथरे नाका येथून या मोर्चाची सुरुवात होणार असुन तहसील कार्यालयावर जाणार आहे. रास्ता रोको आंदोलनास मराठा समाजातील शैक्षणिक सामाजिक सास्कृंतीक राजकिय क्षेत्रातील मान्यवर तसेच मराठा समाज बांधव बहुजन बांधव मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन शांततेत संप्पन झाले.पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.