करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विद्याभूषण आदरणीय प्रा. श्री रामदास झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष शिस्तप्रिय श्री राणा दादा सूर्यवंशी साहेब संस्थेच्या सचिवा ध्येयवादी सौ.माया झोळ मॅडम तसेच दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय डॉक्टर श्री विशाल बाबर सर यांच्या संकल्पनेतून दत्तकला शिक्षण संस्थेत मंगळागौर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 1 .9. 23 रोजी वार शुक्रवार या दिवशी दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये मंगळागौर कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक नेमण्यात आले होते. यामध्ये परीक्षक म्हणून सौ .थोरात प्राची अजय सौ .जाधव तृप्ती पराग सौ. वाघ सुषमा प्रवीण सौ. बाबर ऋतिका विशाल सौ .बांदल जयमाला राजेंद्र सौ.सारिका पांडुरंग झोळ सौ .अडसूळ मनीषा धनंजय सौ .खाडे रेखा संजय या परीक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ शिवांजली होले द्वितीय क्रमांक सौ सुनिता कांबळे, तृतीय क्रमांक सौ.रेहाना तांबोळी यांनी पटकावला .तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम सौ.माधुरी पवार द्वितीय सौ.सुषमा शिंदे तृतीय सौ पद्मिनी कदम यांनी पटकावला. सोलो डान्स स्पर्धेत प्रथम सौअभंग रूपाली द्वितीय सौ.स्वाती तायडे तृतीय सौ. कांबळे अमृता उखाणा स्पर्धेत प्रथम सौ.आरती होले द्वितीय सौ.स्वाती थोरात तृतीय सौ.दिपाली पासलकर यांनी पटकावला .तर पाककला स्पर्धेत प्रथम जहानुरा खातून द्वितीय सौ.विधाते रेश्मा तृतीय सौ. निंबाळकर ज्योती यांनी पटकावला. वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून महिलांचे मनोरंजन करण्यात आले. तसेच श्रावणी सखी मंगळागौर उत्सवासाठी माहेरचे अंगण ग्रुप बारामती या ग्रुपच्या मंगळागौर कार्यक्रमाचे ही सुंदर नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर शेवटी बक्षीस वितरण अल्पोपहार कार्यक्रम होऊन प्रत्येक महिलेची हळदीकुंकू लावून ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर सौ.नंदा ताटे मॅडम दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ.यादव मॅडम इन्चार्ज खाडे मॅडम इन्चार्ज धेंडे सर व मनी मॅडम सर्व शिक्षक यांनी हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.