कुटीर रूग्णालयात योग शिबिर घेऊन रुग्णांना दिलासा देण्यासाठी नरारे सरांचे कार्य कौतुकास्पद-डाॅ.जी.यु.गुंजकर

करमाळा प्रतिनिधी करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या मनोबलासाठी व उत्तम आरोग्यासाठी वेळोवेळी योग शिबिरे घेऊन रुग्णांकडून योगासने करून घेतले एवढेच नाही तर कोरोना कालावधीतही रुग्णालयात येऊन योग शिबिरे घेतल्याने योग शिक्षक व सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचा सन्मान वैद्यकीय अधिक्षक डॉ.जी. यु. गुंजकर व डॉ.महेश अभंग यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य नरारे हे वेळोवेळी रुग्णालयात येऊन रुग्णांचे मनोबल वाढवत आहेत. शिवाय योगासनाचे प्रात्यक्षिक करून उत्तम आरोग्यासाठी रुग्णांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे योग दिनाचे औचित्य साधून प्राचार्य नरारे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, पत्रकार राजेश गायकवाड, अलीम शेख तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

वाढदिवसाचा अनोखा उत्सव आकाश चिवटे यांच्याकडून १५० झाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश

" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…

2 days ago

करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुन रोजी‘आधार मेळावा नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – उदय बंडगर

करमाळा, प्रतिनिधी :  करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये  १३  जुनं रोजी आधार मेळावा  आयोजित केला असुन नागरिकांनी…

3 days ago

ब्राह्मण समाजाच्या संघटनासाठी केम येथे मेळावा; तरुणांनी समाज विकासासाठी पुढाकार घ्यावा – संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…

3 days ago

तुषार जाधव यांची शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

    करमाळा प्रतिनिधी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या…

4 days ago

दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महावि‌द्यालयास मान्यता

  करमाळा प्रतिनिधी दौंड तालुक्यातील अग्रगण्य दत्तकला शिक्षण संस्था संचलित "दत्तकला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी" या…

4 days ago