शिवकुमार चिवटे यांच्या पाठपुराव्यातून मिळाली १ महिन्यात तब्बल पाच लाख पंचावन्न हजार रुपयाची वैद्यकीय मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचे मानले आभार

करमाळा प्रतिनिधी पानगाव ता.बार्शी येथील रहिवाशी असलेले सौ.कांचनमाला गणपत देशमुख हे काही दिवसांपूर्वी हार्ट अॅटक आल्यामुळे जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले त्यावेळेस तेथील डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते.शस्त्रक्रियेसाठी ३ लाख ५० हजार रुपये एवढा खर्च सांगितला होता.घरची परिस्थिती साधारण असल्याने त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.अशा बिकट परिस्थितीमध्ये पेशंटच्या कन्या सौ.पल्लवी शिंदे रा.कुंभेज ता.करमाळा व पेशंटचे बंधू जनसेवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब इनामदार रा.अकलूज ता.माळशिरस यांनी करमाळा ता.शिवसेना वैद्यकीय मदत सहकक्षप्रमुख श्री.शिवकुमार चिवटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदतीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून मदत मिळवून देण्यासाठी चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून १,००,०००/- मदत मिळवून दिली तसेच शांतीलाल पन्नालाल ललवाणी रा.कुंभेज ता.करमाळा यांना हृदयरोगावरील शस्त्रक्रिया साठी जहाँगीर हाॅस्पिटल, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य व पत्रकार नरेंद्र ठाकूर व पेशंटचा मुलगा प्रितेश ललवाणी यांनी चिवटेंची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यांना सुद्धा १,००,०००/- मदत मिळवून दिली. संदीप बबन मोरे रा.शेटफळ ता.करमाळा यांच्या वर कॅन्सर वरील निदानासाठी गॅलक्सी केअर सेंटर पुणे येथे उपचार सुरू होते त्यांना शिवकुमार चिवटे यांनी पाठपुरावा करून ५०,०००/- हाॅस्पिटलच्या खात्यावर मदत मिळवून दिली होती पण दुर्दैवाने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
तसेच शिवकुमार चिवटे यांचे जिवलग मित्र सुरज बाळासाहेब इंदुरे यांच्या नातेवाईक सौ.आनंदीबाई दिलीप व्यवहारे रा.आढेगाव ता.माढा यांना काही दिवसांपूर्वी सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटल येथे मेंदूरोगा वरील शस्त्रक्रिया साठी दाखल केले होते. त्यांना चार लाख रुपये खर्च सांगितला होता. चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून त्यांना १,००,०००/- मदत मिळवून दिली. भाजपचे करमाळा तालुका सरचिटणीस अमर साळुंखे-पाटील यांच्या शिफारसीतुन दिलीप शिरगिरे रा.पोथरे यांचे सासरे यशवंतराव मुगुटराव रा.बाघपिंपळगाव ता.गेवराई जि.बीड हे मराठवाडा कॅन्सर हाॅस्पिटल, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल आहेत.त्यांना देखील शिवकुमार चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून १,००,०००/- मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मिळवून दिले. तसेच करमाळा शहर तलाठी कार्यालयातील लिपीक व गजानन स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक सदस्य व मार्गदर्शक समीर बागवान यांचे सोलापूर येथील नातेवाईक गौस अहमदसो लिबूवाले हे नोबेल हाॅस्पिटल, सोलापूर येथे मेंदू रोगावरील उपचारासाठी दाखल आहेत त्यांना देखील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ७५,०००/- रुपये सतत पाठपुरावा करून मिळवून दिले.रावगाव ता.करमाळा येथील वृद्ध महिला शायदा पठाण या शिंदे हाॅस्पिटल करमाळा येथे हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेसाठी दाखल होत्या.त्यांना ३०,०००/- मदत मिळाली.
या सर्वकामी शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख महेश (दादा) चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक लक्ष्मण सुरवसे,करमाळा ता.कक्षप्रमुख दिपक पाटणे यांच्या सहकार्यातून साडे पाच लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत मिळाली असल्यामुळे वरील पेशंटने व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे साहेब, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे साहेब यांचे विशेष आभार मानले.तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे निलेश देशमुख सर, अरविंद मांडवकर सर, रविंद्र ननावरे सर, राहुल भालेराव सर, रोहित वायभासे सर,ॠषिकेश देशमुख सर व दिपाली चव्हाण मॅडम तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संपूर्ण टीम चे आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

11 hours ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

2 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

2 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

4 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

5 days ago