करमाळा प्रतिनिधी करमाळा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या जालना जिल्ह्यातील सराटी येथे झालेल्या लाठी चार्ज हल्ल्याचा निषेध म्हणून तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी भव्य अशा निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा शहरातील महात्मा गांधी पुतळा पोथरे नाका येथून सकाळी दहा वाजता मोर्चाची सुरुवात होणार असून तहसील कार्यालय करमाळा निवेदन देऊन मोर्चा संपन्न होणार आहे. सकल मराठा समाजाच्या या मोर्चामध्ये मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन बांधव सहभागी होणार असून मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्व समाजाने पाठिंबा दिला आहे. यांमध्ये आमदार संजयमामा शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप नारायण आबा पाटील,सकल मुस्लिम समाज,दिंगबर जैन समाज, राजपूत समाज, नागरीक संघटना व्यापारी संघटना ,केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट असोसिएशन कापडी व्यापारी संघटना, मुस्लीम ओबीसी संघटना करमाळा तालुका साहित्य मंडळ किराणा व्यापारी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचबरोबर सर्व जाती-धर्माच्या बांधवांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा देत मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले असून संपूर्ण जगाला शांततेत मोर्चा काढून एक आदर्श निर्माण केला असुन अशा परिस्थितीमध्ये शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाज बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठी चार्ज करून या सरकारने मोठा अन्याय केल्यामुळे मराठा समाजाचा या अन्यायविरुद्ध निषेध मोर्चा काढून या सरकारचा निषेध करून सरकारला जागे करण्याचे काम करणार आहे. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा देण्यासाठी आता समाज सज्ज झाला आहे. जालना सराटी येथील मराठा समाज बांधावाना झालेल्या लाठी चार्ज हल्ल्याचा निषेध करून न्याय मिळवुन देण्यासाठी आरक्षणाची न्याय मागणी मान्य करून घेण्यासाठी मराठा समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.