करमाळा प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील सराटी येथे झालेल्या लाठी चार्ज हल्ल्याचा निषेध म्हणून तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी भव्य असा महामोर्चा काढण्यात आला .करमाळा शहरातील महात्मा गांधी पुतळा पोथरे नाका येथून सकाळी दहा वाजता मोर्चाची सुरुवात होऊन. तहसील कार्यालय करमाळा येथे संपन्न झाला.आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पाच ते दहा हजार नागरिक सहभागी झाले होते. न भुतो न भविष्यती असा सर्वात मोठा मोर्चा संप्पन झाला. रणरागिनीच्या हस्ते निवेदन देऊन सरकारला बांगड्याचा आहेर देऊन मोर्चा संपन्न झाला.रणरागिनींनी भाषण करून मराठा समाजाची सद्यपरिस्थिती आपल्या भाषणामधुन प्रभावीपणे मांडली. मराठा समाजाने आतापर्यंत सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे.सध्या या समाजाची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने खऱ्या अर्थाने त्याला हक्काचे आरक्षण मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. गुणवत्ता असूनही केवळ आरक्षण नसल्याने करीअरची संधी न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.शेतकरी वर्ग सर्वांचा पोशिंदा म्हणून असलेला हा मराठा आहे आपला खऱ्या अर्थाने अन्नदाता असणाऱ्या बळीराजाचा बळी सध्या चालला असून यांना सर्व समाजाबरोबर सर्व जाती धर्मियांनी आपण पाठबळ देणे गरजेचे आहे. हा समाज सध्याच्या परिस्थितीमध्ये आई जेऊ घालीना बाप जगु देईना अशी परिस्थिती झाली आहे अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा जालना येथील मनोज जरांगे यांनी तो समाजासाठी लढा उभा केला. त्या लढ्याला आम्ही जाहीर पाठिंबा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने शांततेच्या मार्गाने आंदोलन आंदोलन करणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. सकल मराठा समाजाच्या या मोर्चामध्ये मराठा समाजाबरोबरच इतर बहुजन बांधव सहभागी झाले होते.मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्व समाजाने पाठिंबा दिला.राजकीय मंडळींनी या मोर्चामध्ये उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. तसेच सर्व राजकीय मंडळींनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला पाठिंबा देऊन मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आपण समाजासाठी काम करणार असल्याचे सांगितले. याबरोबरच सकल मुस्लिम समाज,दिंगबर जैन समाज, राजपूत समाज, नागरीक संघटना व्यापारी संघटन करमाळा तालुका डॉक्टर असोसिएशन व्यापारी संघटना, मुस्लीम ओबीसी संघटना करमाळा तालुका साहित्य मंडळ किराणा व्यापारी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचबरोबर सर्व जाती-धर्माच्या बांधवांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा देत मोर्चामध्ये सहभागी करमाळा शहर शंभर टक्के बंद पाळण्यात आला. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले असून संपूर्ण जगाला शांततेत मोर्चा काढून एक आदर्श निर्माण केला असुन अशा परिस्थितीमध्ये शांततेच्या मार्गाने जालना सराटी येथे मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाज बांधव आरक्षणासाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठी चार्ज केल्याबद्दल मराठा या अन्यायविरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने लढा देण्यासाठी आता समाज सज्ज झाला आहे. आरक्षणाची न्याय मागणी मान्य करून घेण्यासाठी मराठा समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चासाठी प्रशासनाच्यावतीने पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटेसाहेब यांनी पोलिसांचा शिस्तबद्ध पद्धतीने बंदोबस्त लावला होता. मराठा समाजाच्या या निषेध मोर्चामध्ये करमाळा शहरासह ग्रामीण भागातील पुरुष महिला जेष्ठ नागरिक लहान मुले मुली समस्त बहुजन बांधव यावरून सर्व जाती धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोर्चा हजारोच्या संख्येच्या उपस्थितीमध्ये शांततेमध्ये संपन्न झाला मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा पवित्रा सकल मराठा समाज यांच्या वतीने घेण्यात आला आहे. भगवा झेंडा हातात मागण्याचे फलक तर डोक्यावर भगवी टोपी कपाळाला भगवा टिळा ही आरक्षणाची दिंडी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आता निघाली असून भगवे वादळ पुन्हा एकदा आले आहे. त्याला आता सर्व समाजाची साथ मिळत असून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची ही लढाई आता आरपारची सुरू झाली आहे तरी सरकारने या समाजाचा विचार करून मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे याबरोबर लाठीचार्ज करणाऱ्यावर कारवाई करावी समाजाला न्याय द्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.