Categories: करमाळा

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅप्पीनेस कोर्सचे 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजन – प्राचार्य बाळासाहेब नरारे सर

करमाळा प्रतिनिधी सुदर्शन क्रिया ही श्री श्री रविशंकर यांनी मानव जीवनाच्या कल्याणासाठी तयार केलेले श्वसनावर आधारीत असलेले तंत्र आहे. मानवाच्या बौध्दिक शाररीक मानसीक अशा सर्वांगीण विकासासाठी आनंदी सुखमय जीवन जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सुदर्शन क्रिया तसेच योग प्राणायाम कोर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षक प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांनी केले आहे. श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून भारतातच नव्हे तर 180 देशांमध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी सुदर्शन क्रियेचा प्रचार प्रसार केला आहे. शरीर मन भावना यांच्यात समन्वय साधून या तंत्रामुळे ताणतणाव मुक्त जीवन थकवा नाहीसा होऊन राग वैफल्य नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावना या माध्यमातून नष्ट होतात. मन शांत एकाग्र होते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सुखमय जीवन कसे जगावे यासाठी ही सुंदर कला आहे.. त्यामुळे सुदर्शन क्रियाच्या माध्यमातून आपले जीवन सुखी संपन्न करण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग सुदर्शन क्रिया योग प्राणायाम कोर्सचा लाभ घ्यावा. हे शिबिर जिल्हा शिक्षक सोसायटी श्रीदेवीचामाळ रोड येथे पहाटे पाच ते आठ या वेळेत दिनांक 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. तरी या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी आपण नाव नोंदणी करणे आवश्यक असुन त्यासाठी खालील खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांनी केले आहे.
श्री बाळासाहेब नरारे सर- 9422446841
डॉ महेश अभंग सर- 94210 62824
डॉ स्वाती घाडगे मॅडम- 93568 22544
श्री अभयकुमार शहाणे सर- +91 94202 96535

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

15 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

18 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago