Categories: करमाळा

सावंत गटाची पंरपरा कायम कृ उ बा समिती वर हमाल – तोलार मतदार संघातून वालचंद रोडगे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध संचालकपदी निवड

करमाळा प्रतिनिधी 
कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पंचवार्षिक निवडणुक मध्ये हमाल तोलार मतदार संघातुन वालचंद रोडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने तो अर्ज छाननी मध्ये मंजूर झालेला आहे. त्यांची बिनविरोध संचालक पदी निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे .
‌‌ हमाल पंचायत चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत गटाचे वालचंद रोडगे यांना हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी त्यांचे काम पाहुन दुसरे वेळी कृ उ बा समितीची उमेदवारी दिली व रोडगे यांना बिनविरोध निवडुन आणुन संचालक पदावर काम करण्याची संधी दिली. स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या विचाराने चालणारी हमाल पंचायत मध्ये आज पर्यंत एक विचाराने हमाल प्रतिनिधी म्हणुन कृ उ बा समिती वर संचालक म्हणुन पाठविण्याची पंरपरा असुन हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांच्या काळात ही चालु असुन आज दुसरे वेळी वालचंद रोडगे हे बिनविरोध संचालक झाले हे उत्कृष्ट संघटनाचे यश आहे. हमाल पंचायत युनियनच्या एकीचा हा विजय आहे. यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांनी ॲड . राहुल सावंत व नुतन संचालक वालचंद रोडगे यांचे अभिनंदन केले.
सदर निवडीची घोषणा होताच सर्व हमाल बांधव सावंत गटाच्या कार्यकर्ते नी पेढे वाटुन व फटाके फोडुन शहरात जल्लोष केला.
यावेळी सर्व हमाल तोलारांचे व ज्ञात अज्ञात सर्व नेते मंडळी चे हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड . राहुल सावंत यांनी आभार व्यक्त केले .

चौकट
कामगार नेते संस्थापक स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या आर्शिवादाने हमाल पंचायतीचे अध्यक्ष ॲड. राहुल (भाऊ) सावंत यांनी मला दुसऱ्यांदा बिनविरोध संचालक पदी संधी दिली तसेच माझे सहकारी हमाल – तोलार यांच्या एकजुटीचा हा विजय आहे . यापुढेही हमाल – तोलार यांच्या न्याय्य हक्क व अधिकार बाबतीत कोणतीही तडजोड न करता त्यांच्या हितासाठी अधिक जोमाने प्रयत्न करणार आहे.

वालचंद रोडगे
नूतन संचालक कृ. उ. बा. स.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago