Categories: करमाळा

श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिल मागणीसाठी 18 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे बेमुदत हलगी नाद धरणे आंदोलन- प्रा. रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल न मिळाल्यामुळे 8 सप्टेंबर रोजी बुमुदत हलगी नाद धरणे आंदोलनाचे आयोजन साखर आयुक्त पुणे येथे करण्यात आले होते. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणामुळे सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.मराठा समाजाचे समर्थन करून पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ऊस बिल मिळण्यासाठी बेमुदत हलगीनाद धरणे आंदोलन 18 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त पुणे होणार असल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी दिली आहे. याबाबतचे निवेदन साखर आयुक्त पुणे सहकार मंत्री जिल्हाधिकारी साखर आयुक्त पुणे कार्यकारी संचालक मकाई कारखाना तहसीलदार यांना देण्यात आले आहे.सदर निवेदनात असे म्हटले आहे की मकाई सहकारी साखर कारखान्याने वारंवार पत्र देऊन सूचना देऊन शेतकऱ्याची ऊस बिल दिले नाही.या पाश्वभुमीवर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस नसल्यामुळे दुष्काळाचे मोठे सावट शेतकऱ्यावर उभे राहिले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सावकाराकडून कर्ज काढण्याची पाळी सर्वसामान्य शेतकऱ्यावर आली असून हा मुलांचे शिक्षण ,लग्न, आरोग्य याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांमध्ये मकाई कारखान्याविषयी प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याचे ऊस बिल न दिल्यास मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे आता शेवट आरपारची लढाई म्हणून 18 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त पुणे येथे भव्य हलगीनाद व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे. या निवेदनावर दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद देवकते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव मांढरे पाटील,सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पाटील देविदास गायकवाड ,सिद्धेश्वर शिंदे यांच्या सह्या आहेत. बेमुदत हलगी नाद धरणे आंदोलनास मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

35 mins ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

20 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

23 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

1 day ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago