Categories: करमाळा

चोंडी ता.जामखेड येथे धनगर आरक्षण अमलबजावणीसाठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना जाहीर पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातून रविवारी दि.१७ रोजी सकाळी ९:३० वाजता दत्त मंदीर करमाळा येथून भव्य मोटार सायकल रॅली

करमाळा  प्रतिनिधी
एस.टी.धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.तसेच चौंडी येथे यशवंत सेनेचे समाज बांधव गेली आठ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले असून देखील विद्यमान सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी अजून देखल दखल घेतली नसल्याची फार मोठी खंत आहे. त्या उपोषण कर्त्यांची तब्येत दिवसां दिवस ढासळत असून प्रशासन समाज बांधवांच्या जिवाशी खेळत आहेत. त्याच निषेधार्थ सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या वतीने दिनांक १७ /९ /२०२३ वार:- रविवार रोजी जेऊर बाजार तळ येथून सकाळी ९:०० वाजता तर दत्त मंदिर काॅटेज येथून सकाळी ९:३० वाजता भव्य मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ होणार आहे. चौंडी येथे जाऊन करमाळा तालुक्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्ध पत्राद्वारे म्हटले आहे. चोंडी ता.जामखेड येथे धनगर आरक्षण अमलबजावणी साठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना जाहीर पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातून उद्या शनिवार ऐवजी रविवारी दि.१७ रोजी सकाळी ९:३० वाजता दत्त मंदीर करमाळा येथून भव्य मोटार सायकल रॅली निघणार आहे.
सकल धनगर समाजाच्या वतीने करमाळा ते चौंडी भव्य मोटारसायकल रॅली काढून या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रानंतर निदर्शन आंदोलन स्थगित- वैभवराजे जगताप.

करमाळा - प्रतिनिधी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता यासह इतर समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक ८/१०/२०२६…

3 days ago

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमची करमाळा येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

  करमाळा प्रतिनिधी :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सोलापूर…

3 days ago

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

3 days ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

6 days ago