करमाळा प्रतिनिधी मानवी जीवनामध्ये अभियंत्याचे महत्त्व अनन्यसाधारण असून जीवनातील अनेक अडचणीवर अभियंता मार्ग काढत असतो त्यामुळे अभियंत्याचे शिक्षण हे सर्वात जास्त उपयुक्त असून चंद्रयान यशस्वी मोहीम करण्याकडे अभियंत्याचे परिश्रममाचे फळ असल्याचे प्रतिपादन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.अभियांत्रिचे शिक्षण घेत असलेल्या नवोदित प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून डॉ.हेमंत अभ्यंकर सर, श्री. चित्तरंजन महाजन सर, दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राणादादा सूर्यवंशी सर, सचिव सौ. माया झोळ मॅडम , प्रशासकीय अधिकारी डॉक्टर विशाल बाबर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. हेमंत अभ्यंकर सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिकत असताना त्याचा आनंद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उच्च शिक्षण स्वखर्चाने किंवा शैक्षणिक कर्ज घेऊन करणे ही काळाची स्वावलंबी शिक्षणाची खरी गरज असून पैशाची किंमत आपणाला कळाली तर खऱ्या अर्थाने जग दुनियादारी समजून आपले जीवन यशस्वी व सफल होईल.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना श्री. चित्तरंजन महाजन सरांनी ही आपल्या अनोख्या शैलीत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की अभियांत्रिकीचे शिक्षण आत्मसात करून त्याचा वापर आपल्या दररोजच्या जीवनातील समस्या अडचणी सोडवण्यासाठी केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी या दृष्टिकोनातून अभियांत्रिकीचा अभ्यास करून आपल्या जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन त्यांनी केले. दत्तकला शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन शिक्षण कसे घ्यावे व जीवनात कसे यशस्वी होता येईल याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी दत्तकला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आप्पासाहेब केस्ते, उपप्राचार्य श्रीकांत साळुंखे संचालक डॉ. शरद करणे यांच्यासह दत्तकला शिक्षण संस्था अभियांत्रिका शाखेचे सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.