Categories: करमाळा

भाजपा विशेष निमंत्रिताच्या यादीत माजी आमदार जयवंतराव जगताप तर भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी शंभुराजे जगताप यांची वर्णी

करमाळा प्रतिनिधी भाजपा विशेष निमंत्रिताच्या यादीत माजी आमदार जयवंतराव जगताप तर भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी शंभुराजे जगताप यांची वर्णी लागली आहे.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष (माढा ) चेतनसिह केदार सावंत यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली . त्यामधे विशेष निमंत्रित सदस्यांच्या यादीत करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना स्थान देण्यात आले आहे . तर माजी आ .जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे . यामुळे जगताप गटात आनंदाचे वातावरण आहे . जगताप यांनी पूर्वीपासूनच वेळोवेळी भाजप समर्थनाची भूमिका घेतलेली आहे .सन २००० साली नगरपालिका निवडणुकीवेळी जगताप यांनी काँग्रेसमधे असताना भाजप बरोबर कमळ या चिन्हावर युती केली होती .सन २००९ साली दस्तरखुद्द शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार असताना तत्कालीन आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय नुकसानीची पर्वा न करता स्वतःचे राजकीय भवितव्य पणाला लावत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा प्रचार केला होता . सन २०१९ साली लोकसभा निवडणुकीपूर्वी जगताप गटाने युवानेते शंभूराजे जगताप यांचे नेत्तृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत ( दादा ) पाटील , आमदार राजेंद्र राऊत ,रणजितसिह निंबाळकर , रणजीतसिह मोहिते पाटील , सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात भाजपमधे प्रवेश केला होता . लोकसभा निवडणूकी मधे त्यावेळी निंबाळकर यांच्या प्रचारात युवानेते शंभुराजे जगताप यांनी मोठा झंझावती प्रचार केला होता . २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठींबा देताना निवडून आलेनंतर भाजपला पाठींबा देण्याची अट घातली होती . त्यास अनुसरून आ . संजयमामा शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना पाठींब्याचे पत्र दिले होते . या सर्व बाबींचा विचार करता भाजपने देखील जगताप यांचा योग्य सन्मान केल्याचे दिसून येत आहे .याचा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला निश्चितच फायदा होईल .

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago