करमाळा प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा भाजप संपर्क कार्यालय येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी व संजय घोरपडे यांच्या हस्ते भारत मातेला समर्पित पुत्राची कहाणी या नरेंद्रजी मोदी यांच्यावर आधारित प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शन आलेखावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मापासून ते आज पर्यंत सामाजिक, राजकीय व देशासाठी केलेल्या महान कार्याचे लेखन केलेले आहे, या प्रदर्शनामुळे करमाळा तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी व नागरिकांना नरेंद्रजी मोदी यांचा जीवनपट अभ्यासायला मिळणार आहे,
हे प्रदर्शन 17 सप्टेंबर ते 2 दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत ठेवले जाणार आहे अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले आहे,
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे , व्यापार आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया,बिटरगावचे सरपंच डॉ.अभिजीत मुरूमकर, मकाई सहकारी साखर कारखाने संचालक हरिभाऊ झिंजाडे, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन झिंजाडे, जिल्हा चिटणीस विनोद महानवर , विष्णू रंदवे, सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे, जयंत काळे पाटील, मच्छिंद्र हाके, दादासाहेब देवकर, आबा वीर ,बापू मोहोळकर ,भरत गुंड ,हर्षद गाडे, किरण शिंदे, दादा गाडे, मनोज मुसळे ,सुरज लष्कर, संदीप काळे , वसीम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते ,
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…