चोंडी येथे गेल्या बारा दिवसापासून आण्णासाहेब रुपनवर पाटील (माळशिरस) व सुरेश बंडगर (परभणी ) हे दोघे उपोषणास बसलेले आहेत. त्यांची तब्येत बिघडली असून रूपनवर पाटील यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेश बंडगर हे ही अत्यवस्थ आहेत. असे असताना शासन अद्याप ही मूग गिळून गप्प बसले आहे . याचा संताप संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवा मधे आहे . राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळी आंदोलने सुरू आहे. राज्याच्या विविध भागातून धनगर बांधवासह इतर समाजघटकांडून , विविध सामाजिक संघटनांकडून चोंडी येथे जाऊन पाठींबा देत आहेत.
करमाळा तालुका सकल धनगर समाजानेही रविवारी शेकडो मोटारसायकल ची भव्य रॅली काढून चोंडीत जाऊन शासनाचा निषेध करीत आपला पाठींबा जाहीर केला.
या रेली त करमाळा सकल धनगर समाजाचे नेते ,करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजी बंडगर , आदिनाथ चे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे,प्रा अर्जुन सरक, पंचायत समिती चे माजी सभापती अतुल पाटील, माजी सदस्य विलास पाटील, डाॅक्टर अशोक शेळके,अंगद देवकते,अण्णा सूपनवर, दादा कोकरे,पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर,आदिनाथ चे माजी संचालक विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वतीने शंभूराजे जगताप यानी पाठींबा दिला.रॅली करमाळा दत्त मंदिर, तहसील कार्यालय, मार्गे करमाळा शहरातील महापुरुषांना पुष्पहार घालून मांगी मार्ग चोंडीत पोहोचली.चोंडीत उपोषणास बसलेल्या सुरेश बंडगर यानी पाठींबा स्वीकारला.प्रा बंडगर यानी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीत बाबत मनोगत व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…