करमाळा शहरात गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांचा वापर, गुलाल विरहित मिरवणूक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भाविकांनी भर दिल्याचे दिसून आले. सकाळपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मोरया मोरयाचा गजर सकाळपासूनच कानी पडत होता. भक्तिमय वातावरणात भाविकांनी आपपल्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना केली; तर सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली.करमाळा शहरात,ग्रामीण भागात गणरायाचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.लहान मोठे मंडळांनी आप आपल्या गल्लीत गावात गणरायाची प्रतिष्ठापणा केली
आहे. मूर्तिकाराच्या दुकानापासून बँड पथकाच्या तालावर युवकांनी मिरवणूककाढत गुलालाची उधळण करत आपापल्या गल्लीत गणरायाची प्रतिष्ठापणा केलीहोती.ग्रामीण भागात काही ठिकाणी लेझीम झांज पथकाच्या तालावर युवकांनी मिरवणूक काढत प्रतिष्ठापणा केली होती सर्वत्र ऊत्साही आनंदाचे वातावरण होते.यावेळी शहरातील सर्व रस्ते गजबजले होते गणरायाचे विविध साहित्य खरीदी करण्यासाठी घरातील महिला मंडळ तसेच लहान मोठे नागरिक मुलांनी गर्दी केली होती.यावेळी करमाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
फुलांचा भाव वधारला
बाप्पाची आरास, आरतीसाठी फुले, हार यासाठी फुलांची आवश्यकता भासतेच. त्यामुळे गणपती आगमनाच्या पहिल्याच दिवशी फुलांचा भाव वधारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एरव्ही २० रुपयांना मिळणाऱ्या फुलांच्या हाराची किंमत दुपटीने वाढल्याचे पाहायला मिळाले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…