Categories: करमाळा

गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब करमाळा गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा शहरातील श्री गजानन सोशल अँड स्पोर्ट्स गणेशोत्सव मंडळ समितीच्या अध्यक्षपदी संदीप ओतारी यांची तर उपाध्यक्षपदी सुरज बागडे यांची निवड करण्यात आली आहे गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब या मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सचिव म्हणून फरहान काझी खजिनदार पदी अनिकेत ढाळे सहसचिव म्हणून आयुष ढाळे मिरवणूक प्रमुख पदी शफिकभाई शेख यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व पदेधिकार्‍याचे मंडळाचे वतीने संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. या मंडळाची स्थापना 14 जानेवारी 2000 मध्ये झाली असून तेव्हापासून गणेश उत्सव सामाजिक उपक्रम तसेच मागील काही वर्षापासून करमाळा शहरात गणेश जयंती हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असुन हिंदू मुस्लिम बांधवही गुण्या गोविंदाने या मंडळात काम करत असून सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याचे संस्थापक प्रशांत ढाळे यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

12 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

16 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

17 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago