करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सत्याचे तत्वाचे निष्ठेचे राजकारण करण्याचे काम माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले असून सत्याचा वाली परमेश्वर असतो याची मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भाऊंनी बाजार समितीवर मिळवलेली बिनविरोध सत्ता असल्याचे मत तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी व्यक्त केले .तपश्री प्रतिष्ठानच्यावतीने करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बिनविरोध सत्ता मिळवल्याबद्दल तपश्री प्रतिष्ठान गुरु गणेश गोपालन संस्थेच्या वतीने भाऊंचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास प्रसिद्ध व्यापारी नितीन दोशी, पत्रकार दिनेश मडके,जमीलभाई काझी, वर्धमान खाटेर , गणेश बोरा, दिनेश मुथा, आकाश दोशी गिरीश शहा, विजय बरीदे, ननवरे मामा, यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना श्रेणीक शेठ खाटेर म्हणाले की माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आमदार नगरपालिका साखर कारखाना जिल्हा परिषद पंचायत सामिती ग्रामपंचायत बाजार समिती या ठिकाणी आपली सत्ता असताना सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून सत्याची कास धरुन राजकारण केले आहे . कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये एकाहाती बिनविरोध मिळालेली सत्ता ही नीतिमत्तेने केलेल्या राजकारणाचा विजय असून संघर्षातूनही सत्याची कास न सोडता परमेश्वरावर असलेल्या श्रध्दा विश्वासाच्या बळावर संकटावर यशस्वी मात केली आहे. विरोधकालाही आपले वाटणारे भाऊ खऱ्या अर्थाने आधुनिक राजकारणातील पांडुरंग असून भाऊच्या संघर्षमय राजकारणातून यशाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. त्यांच्या या कार्यास आपला सदैव पाठिंबा असून जनता जनार्दन आई कमला भवानी यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याने भाऊंच्या यशाचा आलेख वाढत जाणार आहे .राजकारणातील मनासारखा राजा राजासारखे मन असलेले भाऊ यांचे कार्य जनतेसमोर असल्याने सत्याच्या नितीमत्तेच्या परमेश्वराचा आशिर्वाद जनता जनार्धनाच्या पाठबळावर त्यांची पुढील वाटचाल उज्वल असल्याचे श्रेणिकशेठ खाटेर यांनी सांगितले.