Categories: करमाळा

महाराष्ट्र राज्यातील शिक्षण आरक्षण समस्या निवारणबाबत माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेऊन प्रा. रामदास झोळसर यांची समस्या सोडवण्याची मागणी

*करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील शिक्षण व आरक्षणाची समस्या निवडण्यासाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी लक्ष देऊन समस्या सोडवण्याची मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी 29 सप्टेंबर रोजी त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.त्यांच्यासमवेत शिवनगर विद्या प्रसारक मंडळ मालेगावचे सचिव माननीय प्रमोद शिंदे सर यावेळी उपस्थित होते. शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये मागील काळात म्हणजेच लाॅकडाऊन मधील म्हणजेच 2020- 21 मध्ये आदरणीय शरद पवारसाहेब यांनी शिक्षण मंत्री उदय सामंत यांची बैठक लावून इतर राज्याप्रमाणे अभियांत्रिकी व औषध निर्माण अभ्यासाची प्रवेश पात्रता करण्याबाबत संबंधितांना सांगून बदल करण्यात आला .त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना झाला परंतु प्रवेशाबाबतीत इतर विषयावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ज्यामध्ये इयत्ता बारावी नंतरच्या सर्व खाजगी विद्यापीठे व इतर महाविद्यालयाची प्रवेशाची अंतिम तारीख एकच करणे सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकसारखी करणे. प्रवेश परीक्षा ची संख्या कमी करणे, समुपदेशन फेरी पुन्हा सुरू करणे इत्यादी बाबत चर्चा करून समस्या सोडवण्याची मागणी केली. याबरोबरच शिष्यवृत्ती मध्येही महाराष्ट्र राज्यांमध्ये सामाजिक आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक शुल्का मध्ये सवलत दिली जाते. सदरचे शुल्क शासन संबंधित महाविद्यालयाला देत असते परंतु मागील दहा-बारा वर्षांपासून सदरची शुल्क देण्यामध्ये शासनाची दिंरगाई होत असल्याने शैक्षणिक संस्थांना बँकांची देणे सरकारचे कर शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांचे ,पगार ,लाईट ,पाणी इंटरनेट व इतर मेंटेनेसची बिले वेळेस देण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग बहुजन समाज कल्याण विभाग व इतर आणि विभागाचे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याची मागणी करण्यात आली तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना असणारी स्वयंम स्वधार योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील व्यावसायिक महाविद्यालय शिकणाऱ्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंम स्वधार योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे . तसेच महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत महाराष्ट्र व केंद्र सरकार यांना वारंवार मागणी केलेली आहे .परंतु सदरचे आरक्षण मिळाल्याने समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे म्हणून सध्या आरक्षण मिळेपर्यंत इतर समाज बांधवांप्रमाणे आरक्षणाशिवाय मराठा समाजाला देता येऊ शकणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती बाबत विविध मुद्द्याद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे ,शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर, प्राध्यापक रामदास झोळ,माननीय मंगेश चिवटे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृहावरती पूर्ण परवानगीने मीटिंग लावून मागणी करण्यात आली होती. याबाबतची माहिती देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मीटिंगमध्ये देण्यात आली. त्याचबरोबर इतर समाज बांधवाप्रमाणे आरक्षणाशिवाय मराठा समाजातील युवकांना घदेता येऊ शकणारे शैक्षणिक व इतर सवलती बाबत चर्चा करण्यात आली. सदर मागण्या पूर्ण करण्यासाठी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात याबाबतची चर्चा करून याबाबत मागणीचे निवेदन प्राध्यापक रामदास झोळसर यांनी दिले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

10 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

11 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago