अनंत श्री विभूषित जगद्गुरू मानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पूर्वनियोजित पादुकादर्शन सोहळा सोलापूर, दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता कुर्डूवाडी मार्केट यार्ड येथे संपन्न होणार आहे.या सोहळ्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातून लाखो भाविकांची हजेरी लागण्याची शक्यता आहे,कार्यक्रमाच्या दिवसी सकाळी ठिक ९:०० वाजता जगद्गुरु श्रींच्या मिरवणूकेने संतपीठावर आगमन होणार आहे,त्यानंतर श्रींच्या पादुकांचे पुजन,आरती, प्रवचन,दर्शन असा एकदिवसीय पादुकादर्शन सोहळा संपन्न होणार आहे.यावेळी _सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमाअंतर्गत गरिब व गरजू व्यक्तींना १९ पिठांची गिरणींचे वाटप करण्यात येणार आहे.श्रींच्या पादुकादर्शन सोहळ्यास उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे ही आयोजन केले आहे,तरी या महामंगल समयी उपस्थित राहून जगद्गुरु सिद्ध पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सोलापूर जिल्हा भक्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…