Categories: करमाळा

दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करावे सतीश नीळ यांनी केली निवेदनाद्वारे मागणी

करमाळा. प्रतिनिधी 

करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वरदान ठरलेल्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याची मागणी मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नीळ यांनी म्हटले आहे की पूर्व भागातील शेतकर्यांना दहीगाव उपसा सिंचन योजना ही संजीवनी ठरली आहे.या योजनेच्या पाण्यावर उस,केळी,फळबागांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली.शेतकर्यांच्या दारात समृद्धीचे दिवस येत असतानाच उजनी जलाशयातील पाणी पातळी खालावल्याने ही योजना पाण्याअभावी बंद झाली.परिणामी लाखो रुपये खर्च करून आणलेली पिके वाया गेली.ज्या शेतकर्यांना विहीर बोअरला पाणी होते अशा शेतकर्यांनी प्रयत्न करुन पिके जगवली.सद्या उजनी धरणातील पाणी साठ्यात ३३टक्क्यांपर्यत वाढ झाली असून सध्य स्थितीत दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या जँकवेल मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.प्रशासनाने शेतकर्यांन प्रती सहानुभूती पूर्व विचार करुन दहीगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे सदर निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी सोलापूर,प्रांतधिकारी कूर्डवाडी, जलसंपदामंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत

चौकट
सोलापूर शहराला पिण्यासाठी २ टीएमसी पाण्याची आवश्यकता असताना वर्षभरात २०ते २२टीएमसी पाणी नदीद्वारे सोडावे लागते.परिनामी येथील दहीगाव उपसा सिंचन योजने सह उजनी पाणलोट क्षेत्रातील शेती धोक्यात येते.त्यामुळे उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करुन पाण्याचे योग्य नियोजन करावे

सतिष नीळ
संचालक मकाई साखर कारखाना.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

6 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

2 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

2 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

3 days ago