Categories: करमाळा

समूह शाळेच्या निर्णयाविरोधात मुख्यमंत्र्यांना भेटणार – सौ. शितल कांबळे

करमाळा प्रतिनिधी- राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने धक्कादायक निर्णय घेतला आहे या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे समूह शाळा सुरू करण्यासंदर्भात ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचा आदेश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत या निर्णयामुळे राज्यातील वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४७८३ शाळा बंद होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे या निर्णयाविरोधात आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या सचिवा व रावगांव शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ . शितल रामदास कांबळे यांनी म्हटले यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, राज्यात २०२१ – २२ च्या आकडेवारी वारीनुसार २० पेक्षा कमी पटसंख्येच्या सुमारे १४ हजार ७८३ शाळा सुरू आहेत त्यामध्ये १लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत . दुर्गम भागातील वाड्या- वस्त्यावर शिक्षण पोहोचवावे यासाठी सरकारने शाळा चालू केल्या होत्या. मात्र राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार या शाळांचे समूह शाळात रूपांतर होणार आहे सरकारचा हा निर्णय घाईचा आहे आत्ताची समूह शाळांची प्रक्रिया विरुद्ध पद्धतीने राबवली जात असल्याचे सूर शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत. सरकारने या निर्णयाविरोधात फेरविचार करावा असे कांबळे म्हणाल्या, या निर्णयाचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या शाळांना बसणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली शाळा दूर झाल्यावर त्याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होईल शाळा दूर झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास वाढणार आहे परिणामी विद्यार्थ्यांच्या प्रवासाची जबाबदारी कोण घेणार ? हा देखील प्रश्नच आहे शिक्षण हक्क कायद्याला पायदळी तुडवणाऱ्या धोरणाचा आपण निषेध करत आहोत असे कांबळे यांनी म्हटले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

19 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago