विश्वरत्न हजरत महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त तपश्री प्रतिष्ठान भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू निदान उपचार शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी विश्वरत्न हजरत महंमद पैगंबर यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून करमाळा शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी तपश्री प्रतिष्ठान व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने *मोतीबिंदू निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या वेळी करमाळा शहर व तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून उपचारासाठी रूग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुण्यातील प्रसिद्ध हाॅस्पिटल इनलॅक्स बुधरानी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहे.. अंध लोकांची काठी होण्यापेक्षा दृष्टी देऊन डोळे होण्याचा प्रयत्न करणार आहे असे  मार्गदर्शक दानशूर व्यक्तीमत्व श्रेणिक शेठ खाटेर( संस्थापक तपश्री प्रतिष्ठान करमाळा ) यांनी सांगितले आहे. यावेळी प्रतिष्ठीत व्यापारी नितीन शेठ दोशी, नाभिक संघाचे अध्यक्ष नारायण पवार , साप्ताहिक पवनपुत्रचे संपादक दिनेश मडके उद्योजक जमील भाई काझी, सामाजिक कार्यकर्ते गुलाम गौस भाई कुरेशी  जमीर सय्यद  अध्यक्ष जामा मस्जिद करमाळा रमजान बेग  सचिव डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन  आझाद भाई शेख उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करमाळा जहाँ गीर बेग उपाध्यक्ष डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन  जिशानभाईजी कबीर  युवक नेते व सकल करमाळा मुस्लीम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शक श्रेणिक शेठ खाटेर यांचा सकल करमाळा मुस्लीम समाजा तर्फे त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या सामाजिक कार्याबद्दल जे योगदान दिले आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 mins ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

29 mins ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago