Categories: करमाळा

संघर्षमय जीवनातून जिद्द चिकाटी परिश्रम याच्या जोरावर यशस्वी वाटचाल करणारे मुकुंद साळुंखे सर यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी- शंभुराजे जगताप

करमाळा प्रतिनिधी संघर्षमय जीवनातून जिद्द ,चिकाटी परिश्रम याच्या जोरावर यशस्वी वाटचाल करणारी मुकुंद साळुंखे सर यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे मत जगताप गटाचे युवा नेते कृषी उत्पन्न बाजार समिती संंचालक भाजप जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभुराजे जगताप यांनी व्यक्त केले. मुकुंद साळुंखे सर यांनी चांदगुडे पेट्रोल पंपा जवळ करमाळा बायपास चौकामध्ये नव्याने सुरू केलेल्या फौजी स्नॅक्स सेंटरच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणीचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील , उद्योजक शिवसेना युवा सेनाचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे,पोपट थोरात गुरूजी सामाजिक कार्यकर्ते महादेव फंड नगरसेवक अतुल फंड, प्रताप बरडे सर पत्रकार आशपाक सय्यद,जयंत दळवी, मयूर साळुंखे, सौरभ साळुंखे, मा. सरपंच खंडू काळे उत्तम हानपुडे सर, महादेव खरात, दत्तात्रय दळवी ,संजय सोनवणे उपस्थित होते. यशकल्याणीचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ करे पाटील म्हणाले की मुकुंद साळुंखे सर यांनी शिक्षक या नात्याने आदर्श काम केले असून माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष या माध्यमातुन शिक्षकांना न्याय मिळवुन देण्याचे काम केले असुन त्यांचे कार्य अविरतपणे चालु आहे.धन निरंकार मंडळाच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्य चालु आहे. मनुष्य जीवनामध्ये खरा पुरुषार्थ सांगितला असून आपल्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे. जीवनात आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असो सत्याच्या व प्रामाणिकतेच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण मुकुंद साळुंखे सर यांचे आहे.स्वेच्छा निवृत्तीनंतरही स्वस्थ न बसता सतत कामाची आवड ध्यास असलेले साळुंके सरांनी स्नॅक़स सेंटर सुरु केले आहे. याचा आदर्श युवा पिढीने घेऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय करावा असे ते म्हणाले फौजी स्नॅक्स सेंटरच्या भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.मुकुंद साळुंके सरांनी सुरू केलेल्या स्नॅक़्स सेंटरला शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्या या उद्घघाटन संमारंभास सर्व क्षेत्रातील मान्यवर शिक्षक स्टाॅफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

11 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

12 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago