Categories: करमाळा

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील 24 गावांचा पाणी प्रश्न संपणार उद्यापासून दहिगाव उपसा सिंचनचे आर्वतन सुरू होणार -आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी 

         करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन लवकरात लवकर सुरू करणे संदर्भात आग्रही मागणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली होती. त्यानुसार आज दि.1 ऑक्टोबर 2023 रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन त्यामध्ये उद्या दि. 2 ऑक्टोबर पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.

         याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात उजनी धरण 33 टक्के भरल्यानंतर खरीप आवर्तन सुरू करण्याचा प्रघात आहे, परंतु यावर्षी करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे वजा पातळीमध्ये असलेले उजनी धरण अधिक 13% असतानाच आपण वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार करून विशेष बाब म्हणून आवर्तन सुरू करण्याची आग्रही मागणी केलेली होती. परंतु हवामान अभ्यासकांकडून येणारे अंदाज व भविष्यकाळामध्ये उजनी धरण न भरल्यास सोलापूर सह इतर तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी उजनी धरणातील पाणी आरक्षित करून पिण्यासाठी राखीव ठेवले होते. सुदैवाने उजनी धरण लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे .काल उजनी धरण 32 टक्के असतानाच आपण या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती पत्रव्यवहार व चर्चा केली त्यानुसार आज 1 ऑक्टोबर रोजी कालवा सल्लागार समितीच्या बैठक होऊन दहिगाव योजनेचे आवर्तन उद्यापासून सुरू होत आहे . या आवर्तनामुळे करमाळा तालुक्यातील पूर्व भागाच्या 24 गावातील केळी बागांसह ऊस व इतर पिकांना जीवदान मिळणार आहे.

 

चौकट – 

दहिगाव योजना 100% क्षमतेने कार्यान्वित करणार – श्री.एस .के .अवताडे ( उपविभागीय अधिकारी, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.12 )

          आज दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टप्पा 1 व टप्पा 2 या दोन्ही पंपगृहांची पाहणी केली आहे.सर्व पंप सुस्थितीमध्ये आहेत.टप्पा 1 दहिगाव येथील 6 पंपाचे टेस्टिंग केलेले आहे तसेच टप्पा 2 कुंभेज येथीलही 4 पंप टेस्टिंग करून ठेवलेले आहेत .त्यामुळे उद्यापासून दहिगाव उपसा सिंचन योजना 100 टक्के क्षमतेने कार्यान्वित होण्यास काहीही अडचण येणार नाही. सर्वांना योग्य पद्धतीने पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago