Categories: करमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास नॅक समितीची भेट

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा प्रतिनिधी  करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास बेंगलुरू येथील नॅशनल ॲसेसमेंट अँड Requirements कौन्सिल( नॅक) या संस्थेच्या पथकाने भेट देवून महाविद्यालयाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली.
नॅकद्वारे गठित करण्यात आलेल्या पिअर टीमचे अध्यक्ष जबलपूर येथील महाकौशल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रमेश चंद्र मिश्रा हे होते, तसेच त्यांच्या समवेत समन्वयक म्हणून डॉ. श्रीलथा के.( केरळ) आणि सदस्य डॉ. रामनाथन सुब्रमण्यम( तामिळनाडू) यांनी काम पाहिले.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, सहसचिव विक्रम सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे ( वरिष्ठ विभाग), उपप्राचार्य प्रा. संभाजी किर्दाक, नॅक कोऑर्डिनेटर प्रा. अभिमन्यू माने, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थित महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांनी नॅक समितीचे स्वागत गार्ड ऑफ ऑनर देवून व विद्यार्थिनींनी औक्षण करून केले.
या दोन दिवसीय भेटीमध्ये नॅक समितीने महाविद्यालयीन कामकाजाची तपासणी केली तसेच आजी व माजी विद्यार्थ्यां बरोबर संवाद साधला.
समितीच्या सन्मानार्थ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.नितीन तळपाडे आणि एन.सी.सी. चे केअर टेकर ऑफिसर निलेश भुसारे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या माध्यमातून सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यकमास नॅक समितीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मनापासून दाद दिली आणि सर्वकलाकरांचे कौतूक केले.
नॅक समिती भेट दौरा यशस्वी होण्यासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कमचारी आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

1 day ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago