करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील आदर्श शिक्षिका सौ. राणी प्रल्हाद राऊत साळुंखे यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साई समर्थ फाउंडेशन सांगोला यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा कामोणे या शाळेत सौ.राणी राऊत साळुखे कार्यरत असून सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मुकुंद साळुंखे सर यांच्या धर्मपत्नी आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध प्रयोगाचा माध्यमाचा आपल्या शाळांमध्ये उपयोग करून शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याने या कार्याची दखल घेऊन श्री साई समर्थ फाउंडेशन च्यावतीने शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका गौरव पुरस्काराने सांगोला येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार साई समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष हिंदुराव ढवळे , सांगोल्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील उपशिक्षणाधिकारी मयूर लाडे. माध्यमिक शिक्षक संघटना ठी डी एफ राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव जमाले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक देण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत पती मुकुंद साळुंखे सर चिरंजीव शुभनीत साळुंखे यांनी परिवारासह हा सन्मान स्वीकारला सौ.राणी राऊत साळुंखे यांना शैक्षणिक कार्याबद्दल आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय तसेच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.