करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अभिषेक आव्हाड यांची आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे आणि युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी निवड केली, अभिषेक आव्हाड यांची सुरवात करमाळा शहर सचिव म्हणून झाली. नंतर सलग 3 वेळेस करमाळा शहराध्यक्ष, सोलापूर वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष तसेच निरीक्षक, आणि आता सोलापूर जिल्हाध्यक्ष पद हे त्यांना पक्षाने कामाची दखल घेऊन दिले आहे. करमाळ्यासारख्या ग्रामीण भागातून सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाची एवढी मोठी जबाबदारी अभिषेक आव्हाड यांना मिळाल्यामुळे करमाळा तालुक्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केल्यावर त्याचे फळ नक्की मिळते यावर आपला विश्वास असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सर्व नेत्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवुन पार पाडणार असल्याचे अभिषेक आव्हाड यांनी सांगितले .गेल्या अनेक वर्षांपासून युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवून युवकांना न्याय मिळवून देणारे, प्रचंड संघर्षातून उभे राहून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्व सिद्ध करणारे अभिषेक आव्हाड यांना महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. निश्चितच अभिषेक आव्हाड यांची काम करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहिलं की राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक मजबूत युनिट उभे राहून राष्ट्रवादी पक्ष उंच भरारी घेईल असा विश्वास सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केला जात आहे. अभिषेक आव्हाड यांच्या निवडीवेळी आमदार संजयमामा शिंदे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, दीपक आबा साळुंखे पाटील आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते.