भिगवन दिनांक 12 10 2023 दत्तकला शिक्षण संस्थेचे दत्तकला ग्रुप ऑफ स्कूल मध्ये आज सन्माननीय डॉ.पद्मजा खरड यांनी जागतिक कन्या दिनाचे निमित्त साधून विद्यार्थिनींना अनमोल असे मार्गदर्शन केले .त्यांनी वयात येत असताना शरीरात होणारे बदल त्याबद्दल छान माहिती दिली आणि या वयात उत्तम आहार कोणता घेतला पाहिजे व्यायामाची शरीरासाठी गरज किती महत्त्वाची आहे याचे मार्गदर्शन करीत असताना सूर्यनमस्कार दररोज करण्यास मुलींना सांगितले याचबरोबर समाजात वावरत असताना Good touch Bad touch ओळखता आला पाहिजे .तो कसा ओळखावा .हेही त्यांनी मुलींना सांगितले .प्रथम तुम्ही तुमचा आदर्श कोण आहे तो ठरवा .तुमच्या वागण्यात संयम ठेवा .आपल्या कोणत्याही कृतीने आई-बाबांची मान खाली जाणार नाही याची जबाबदारी सर्वस्वी मुलींची आहे याचे मुलींनी भान ठेवा असे त्यांनी ठणकावून मुलींना सांगितले. शिका मोठे व्हा विद्वान बना .तुमचे अनुभवी शिक्षक तुमचे आई-बाबा यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही ऐका आणि मोबाईल थोडा बाजूला ठेवून वाचण्याकडे लक्ष द्या कारण मोबाईल पेक्षा स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे त्याकडे लक्ष द्या हेही त्यांनी सांगितले .स्त्री ही नवनिर्मिती करणारी समाजातली एक महान शक्ती आहे ती शक्ती तुम्ही ओळखा एवढं सुंदर कर्तुत्व निर्माण करा समाजाला तुमचा अभिमान वाटेल असे सांगत पद्मा मॅडमनी मुलींना वेळात वेळ देऊन अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. झोळ सर संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री राणादादा सूर्यवंशी साहेब दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा सन्माननीय सौ माया मॅडम दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी सन्माननीय श्री डॉ. विशाल बाबर सर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ग्रुप ऑफ स्कूलच्या डायरेक्टर सौ नंदा ताटे मॅडम दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ यादव मॅडम इन्चार्ज खाडे मॅडम धेंडे सर मनी मॅडम रघुनाथ सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते .झोरे मॅडम यांनी डॉक्टर खरड मॅडम यांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…