करमाळा प्रतिनिधी -दसरा व दिवाळीसणा निमित “मागेल त्याला ५ की दाळ” योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर डीपीडीसी सदस्य गणेश चिवटे यांनी केले आहे.याबाबत अधिक बोलताना चिवटे म्हणाले की,
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त “मागेल त्याला दाळ” योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६०/- रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ मिळणार आहे. सर्वसामान्यांना ही दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळख पत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ही दाळ भाजपाच्या सर्व कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.दाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ खरेदी करता येणार आहे.करमाळा तालुक्यातील भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांना “मागेल तेथे डाळ” विक्री केंद्र प्रत्येक गाव वाडी वस्ती वार्डमध्ये सुरू करून देण्यात येणार आहे. जेणे करून नागरिकांना याचा लाभ घेता येईल.तरी जनतेनी भाजपा कार्यालय करमाळा तसेच भाजपा कार्यकर्ते यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन गणेश चिवटे यांनी केले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…