Categories: करमाळा

दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज केत्तुर नं.1 च्या विद्यार्थिनीची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड.

करमाळा प्रतिनिधी 
.12 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 10 ,सोरेगाव, सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत दत्तकला आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज केत्तुर नं.1च्या आर्या अप्पासाहेब बाबर या विद्यार्थिनीने 17 वर्षे वयोगट मुलींमधे 200मी. रनिंगमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे तिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच 100 मी.रनिंग मध्ये तिने जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. तसेच गोविंद गोरख पाखरे या विद्यार्थ्यांने 17 वर्षे वयोगट मुलांमधे 200 मी.रनिंग मध्ये जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यानंतर
19 वर्षे वयोगट मुलींमधे 200 मी.रनिंग मध्ये प्रगती प्रविण पाटिल या विद्यार्थिनीने प्राथमिक फेरी पार करुन अंतीम फेरीपर्यंत मजल मारली.तसेच दिक्षा रमेश कोडलिंगे या विद्यार्थिनीने प्राथमिक फेरीत चौथा क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन खेळ विभाग प्रमुख रविंद्र बाबर सर यांनी केले. *बालेवाडी,पुणे येथे असलेल्या पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी आर्या अप्पासाहेब बाबर या विद्यार्थिनीची 17 वर्षे वयोगटातून 200 मी.रनिंग या मैदानी स्पर्धेसाठी* ग्रामीण भागातून आणि सर्वसामान्य कुटुंबातून निवड झाल्याने समाजातील सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.
*या सर्व यशस्वी खेळाडूंचे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर,संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राणा दादा सुर्यवंशी साहेब, सचिवा प्रा.माया झोळ मॅडम, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.श्री विशाल बाबर सर,स्कूल डायरेक्टर प्रा.नंदा ताटे मॅडम ,प्राचार्य विजय मारकड सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील…

4 hours ago

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago