करमाळा प्रतिनिधी
उजनी धरणाच्या बांधकामानंतर करमाळा तालुक्यातील 30 गावे पुनर्वसित झालेली आहेत. या गावांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून 18 नागरी सुविधांचे लाभ मिळणे आवश्यक होते. त्यापैकी अनेक गावांमध्ये अद्यापही हे लाभ मिळालेले नाहीत .या गावांच्या समस्यांबाबत शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता पंचायत समिती सभागृह करमाळा येथे जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक बोलावली असल्याची माहिती करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, जानेवारी 2023 मध्ये आपण करमाळा तालुक्यांमध्ये गावभेट दौरा आयोजित केलेला होता. या गाव भेट दौऱ्यात प्रत्येक गावातून आलेल्या समस्यांची नोंदणी केली गेली होती. विशेषतः उजनी धरणाच्या बांधकामानंतर करमाळा तालुक्यातील पुनर्वसीत गावांच्या अनेक समस्या लोकांनी मांडल्या.या समस्या सोडवण्यासाठी पुनर्वसन विभागाकडे आपण जून 2023 मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार सदर बैठक बोलावली असून या बैठकीसाठी वांगी नं.1,वांगी नंबर 2, वांगी न. 3, वांगी नं.4, भिवरवाडी ,दहिगाव, बिटरगाव, कुगाव, चिखलठाण नं.1, चिखलठाण न. 2, ढोकरी, पारेवाडी, केतुर नं.1, केतुर नंबर 2, पूर्व सोगाव, पश्चिम सोगाव,उंदरगाव, गोरेगाव, रिटेवाडी, कविटगाव, सांगवी क्र.1, सांगवी क्र.2, कंदर, पोमलवाडी ,खातगाव नं.1, खातगाव नं.2, कात्रज, नेमतवाडी, टाकळी, कोंढार चिंचोली आदी गावातील नागरिकांनी त्यांच्या समस्यांसह बैठकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…