Categories: करमाळा

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 27 ॲाक्टोंबरपासुन करमाळा येथे चक्री उपोषण- प्रा.रामदास झोळ

करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाची परिस्थिती आरक्षण नसल्यामुळे अत्यंत बिकट झाली असून या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे .काळाची गरज असून मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी दिनांक 27 ऑक्टोबर रोजीपासुन करमाळा तहसील येथे सकाळी दहा वाजल्यापासून चक्री उपोषण करणार आहोत याबाबतचे निवेदन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी दिले. नायब तहसीलदार गायकवाड दादा पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना देण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाची बाजी लावून आरक्षणाची लढाई लढत आहेत मराठा समाजाची समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट असून ठराविक लोक संपन्न असून बाकी इतर समाज मात्र मूलभूत गरजा भागविण्यास सक्षम नाही.आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शैक्षणिक फी भरण्यास पैसा नसल्याने अनेकांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागत आहे व्यवसाय कराव तर भांडवल नाही शेती आहे तर निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसत असल्याने न घर का ना घाट का अशी मराठा समाजाची परिस्थिती झाली आहे .छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले सर्वांना आपल्या भूमिकेतून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्यक्षात आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मागास घटकांना विशेष प्राधान्य देऊन बारा बलुते अठरा पगड जातींना प्रथमता आपल्या राज्यामध्ये आरक्षण दिले आशा छत्रपतीच्या वारसदार असणाऱ्या या समाजाची परिस्थिती सध्या हरवलेली असल्याने या समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची खरी सध्याची गरज आहे राजकारणातही मराठा समाजाची मंडळी समाजाची बाजू न घेतल्यामुळे हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे पण आता ही आरपारची लढाई झाली असून कुठल्याही नेत्या पक्षाच्या वरदहस्त शिवाय सर्वसामान्य कुटुंबातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा समाज एकवटला आहे.त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही या भूमिकेचे समर्थन म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आपण चक्री उपोषण करणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले सदर निवेदनावर कामगार नेते दशरथ कांबळे मा.सरपंच विष्णु रंदवे, सुदर्शन शेळके दिनेश मडके, दगडू भोगल प्रीतम सुरवसे गोपीनाथ पाटील अमोल सुरवसे हनुमंत मांढरे पाटील राजकुमार देशमुख, नागेश चव्हाण,दिपक पाटुळे,सुदाम चव्हाण,नागेश चव्हाण,नरेद्रसिंह ठाकुर,जीवन जाधव,शैलेश गरड,अरुण जगताप,युवराज झोळ,राज झिंजाडे,हरी जगताप,मधुकर काळे ,सिध्दार्थ वाघमारे,अस्लम शेख,सुरेश झांजुर्ण यांच्या सहया आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

10 hours ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

1 day ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

1 day ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago