करमाळा प्रतिनिधी
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन 2 ऑक्टोबर 2023 पासून सुरू असून गेल्या 7 दिवसापासून हे आवर्तन टेल चारी वरील घोटी या गावासाठी सुरू आहे, परंतु कुंभेज येथील पंप गृहापासून शेवटच्या टेल पर्यंत मुख्य कॅनॉल वरती कोणतीही शासकीय परवानगी न घेता अनाधिकृत पणे असंख्य सायफन व इलेक्ट्रिक पंप द्वारे बेसुमार पाणी उपसा होत असल्यामुळे टेल चारी वरील घोटी गावाला 6 दिवस कसरत करूनही पाण्याचा थेंबही मिळालेला नाही. त्यामुळे त्या गावाला पाणी मिळावे या उद्देशाने कुंभेज पंप हाऊस पासून पुढील 8 किलोमीटर पर्यंत कॅनॉल च्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांना 10 दिवस अनधिकृत मोटारी बंद करा व सायफण कायमस्वरूपी बंद करा असे आवाहन दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांकडून केले जात होते.
या आव्हानाला प्रतिसाद न देता उलट आमच्या मोटारी का बंद करता ? सायफण का काढता ? असे म्हणत सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी खडकेवाडी येथील प्रवीण छगन शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 चे उपविभागीय अधिकारी श्री. एस. के. अवताडे यांनी दिली. सदर आरोपी वरती भारतीय दंड संहिता 1860 कलम 353, 341, 427 ,504 व 506 या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
चौकट –
सायफण चालविणाऱ्या विरुद्ध सरसकट गुन्हे दाखल करणार…
यापूर्वी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉल वरून सायफण द्वारे पाणी उचलणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना नोटीस देऊन, ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती नोटीस डकवून तसेच वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्धी देऊन सायफण द्वारे पाणी उचलणे हा गुन्हा असल्याची माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे तरीसुद्धा असंख्य शेतकरी आजही सायफण द्वारे पाणी उचलत आहेत त्याविरुद्धची कारवाई आज 25 ऑक्टोबर रोजी अधिक कडक केली असून महेश आजिनाथ तनपुरे , विशाल पाटील, राहुल मस्कर ,दत्तात्रय किसन आडेकर, अतुल सौदागर वाघमारे आदी व्यक्तीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तक्रार दाखल केलेली असून सायफण विरुद्धची कारवाई अधिक कडक केली जाणार आहे. आज दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी गुळसडी ते घोटी यादरम्यान असंख्य सायफण व अनाधिकृत इलेक्ट्रिक पंपावरती कारवाई केलेली असून इथून पुढे सदर पंप किंवा सायफण चालू दिसल्यास सदर व्यक्ती वरती सरसकट गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती एस.के .अवताडे यांनी दिली.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…