करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट कुणबी म्हणून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणाच्या समर्थ नाथ करमाळ्यात तहसील कचेरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली .मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज व बहुजन बांधवांच्यावतीने प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना देण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकारला 40 दिवसाची मुदत देण्यात आली होती ती मुदत 24 ऑक्टोंबर रोजी संपल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा आपल्या उपोषणास सुरुवात केली आहे करमाळा शहर तसेच तालुक्यातील मराठा मोठ्या प्रमाणात एकवटला आहे. मराठा समाजाच्या वतीने करमाळा तहसील कचेरी येथे साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. मराठा समाजाला आरक्षण पर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असून येथे 28 ऑक्टोबर पर्यंत सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर न केल्यास पुढील आंदोलन आणखी उग्र स्वरूपात करण्यात असल्याचेही आंदोलकर्त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यातील 118 गावांमध्ये मराठा आरक्षणाचे तीव्र पडसाद उमटले असून गावामध्ये पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचाही निर्णय आणि गावाने व ग्रामस्थांनी घेतला असून मराठा समाजाची ही आरपारची लढाई आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज बांधवांनी साखळीने उपोषणास उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवा व मनोज जरांगे यांच्या समर्थनात आपल्या भावी पिढीची भविष्य उज्वल करण्यासाठी या उपोषणा सहभागी व्हावे अशी आव्हान सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे. पुढाऱ्यांनी राजकारणासाठी या आंदोलनात सहभागी नव्हता एक समाज बांधव म्हणून यामध्ये पुढाऱ्यांनी राजकारण न करता मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नियमांचे पालन करून सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज् करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे. या साखळी उपोषणाची शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाज बांधव युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या साखळी उपोषणात मराठा समाजाबरोबरच मोठ्या संख्येने बहुजन बांधव सहभागी झाले होते.