करमाळा प्रतिनिधी- श्री.मकाई सहकारी साखर कारखान्याची गतवर्षीच्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिले लवकरच जमा करून मकाई सहकारी साखर कारखाना यावर्षीचा गळीत हंगाम निश्चितपणे काही दिवसातच सुरू करेल असा विश्वास मकाई सहकारी कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी आज येथे व्यक्त केले याबाबत अधिक माहिती देताना श्री भांडवलकर म्हणाले की मकाई सहकारी साखर कारखान्याच्या गतवर्षीच्या गळीत हंगामातील सभासद शेतकऱ्यांची ऊस बिले देण्याबाबत येत्या काही दिवसातच तातडीने कार्यवाही होत असून सभासदांची ऊस बिले अदा केल्यानंतर मकाई सहकारी साखर कारखाना यावर्षीचा गळीत हंगाम निश्चितपणे चालू होईल व तो यशस्वी होईल सध्या कारखान्यातील अंतर्गत देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू असून ती ही तातडीने पूर्ण होत आलेली आहेत सभासदांनी आतापर्यंत जो विश्वास मकाई कारखान्यावर ठेवलेला आहे तोच विश्वास भविष्यातही कायम राहील यावर्षीच्या हंगामातील ऊस बिले व तोडणी वाहतूकदारांची बिले आमच्या नेत्या साखर संघाच्या संचालिका व मकाई कारखान्याच्या मार्गदर्शिका आदरणीय रश्मीदीदी बागल व युवा नेते व माजी चेअरमन माननीय दिग्विजयजी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली रोख स्वरूपात दिली जाणार असून ऊस उत्पादक सभासदांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये मकाई सहकारी साखर कारखाना हा कारखान्याचे संस्थापक लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या विचारसरणीतूनच कार्यरत असून सभासद शेतकऱ्यांची ऊस बिले देणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले याबाबत आमच्या नेत्या व साखर संघाच्या संचालिका व कारखान्याच्या मार्गदर्शिका आदरणीय रश्मीदिदी बागल व युवा नेते माजी चेअरमन दिग्विजयजी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ याबाबत सातत्याने प्रयत्नशील आहोत त्यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये त्यांनी निश्चिंत राहावे असे आवाहनही श्री. भांडवलकर यांनी शेवटी केले.