Categories: करमाळा

तपश्री प्रतिष्ठानच्यावतीने मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न साठ रुग्णाची मोफत डोळे तपासणी 17 शस्त्रक्रियेसाठी पुण्याला रवाना

*करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान गोसेवा समिती दत्त पेठ तरुण मंडळ व बुधरानी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने  शुक्रवार दिनांक 27 ॲाक्टोंबर रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध डॉ. तुषार गायकवाड , युवा उद्योजक रोहित वाघमारे , भाजप चे जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, गो सेवा समितीचे सदस्य- जगदीश शिगाजी,भाजप चे शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल,नितीन दोशी,शिवसेना नेते संजय शिंदे,राष्ट्रवादी चे अरुण काका टांगडे,दिनेश मुथा, वैभव दोशी आशिष बोरा,यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत सुमारे 4700 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले.आजच्या शिबिरात 60 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 27 रुग्ण ऑपरेशन साठी पुणे येथे रवाना झाले .प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना अध्यक्ष डॉ. तुषार गायकवाड यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. जमीलभाई काझी यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.भाजप नेते विठ्ठलराव भणगे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले.आजच्या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला. *या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल यांचा वाढदिवसाच्या निमित्त सत्कार करण्यात आला*. *तसेच 27 ऑक्टोबर रोजी ईशान संकेत खाटेर याचा प्रथम वाढदिवस असल्याने यावेळी वाढदिवस साजरा करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या*. त्यानिमित्ताने रुग्णांना मिठाई चे वाटप करण्यात आले.शिबिरासाठी प्रकाश लावंड सर,जैन संघांचे खजिनदार कचरूकाका मंडलेचा, अनंता मसलेकर, गुलाम गोस,संतोष भांड ,कांबळे सर,चंद्रकांत काळदाते , विजय बरीदे ,गिरीश शहा, शशि अप्पा ननवरे,यांच्या सह अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संकेत खाटेर यांनी केले.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले..

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

12 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 days ago