मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या हितासाठी अन्न व पाण्याचा त्याग केला आहे. त्याच्या जीवाला काही बरं वाईट झाले तर सपुर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारने वेळीच जागे होऊन याकडे लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे मत प्राध्यापक मिलिंद फंड यांनी व्यक्त केले आहे. तरी यावेळी उपस्थित असलेल्या विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यासपीठावर चालणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे.मागील चार दिवसांपासून करमाळा शहरात व तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळे आंदोलने केले जात आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज सहभागी होत आहे. चार दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमाळ्यातही साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला आज महिलांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर रोज वेगवेगळ्या दोन गावातील कार्यकर्ते येऊन उपोषणाला पाठिंबा देत आहेत. तर आज ब्राह्मण समाजानेही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आपण जरी सधन असलो. तरी आज बराचसा समाज मागासलेला आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. आपण राजकीय व्यासपीठावर कायम दिसत असलो तरी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथून पुढे पुन्हा राजकीय स्टेजवर दिसणार नाही अशी भूमिका यावेळी त्यांनी जाहीर केली आहे. तर वेळोवेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना गरज भासेल त्यावेळी आपण सोबत लढत राहू असेही आश्वासन दिले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…