या मागण्यांबाबत करमाळा तालुक्यातील मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय व ओएसडी मंगेशजी चिवटे यांनी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयातून प्राध्यापक रामदास झोळ यांना मनोजची जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्याच्या आदल्या दिवशी फोन करून या सर्व विषयांबाबत /मागण्यांबाबत तब्बल अर्धा तास फोनवरती चर्चा करून या सर्व विषयांबाबत सविस्तर माहिती घेऊन कशाप्रकारे या सर्व योजना राबवता येतील याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आदरणीय मनोजजी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर दिनांक 11/ 11/ 2023 रोजी पुन्हा मंगेशजी चिवटे यांनी प्राध्यापक रामदास झोळ यांना फोन करून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महाराष्ट्र राज्यातील सचिव व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे झाल्याबद्दल कळविले व त्या बैठकीमध्ये तुम्ही (प्राध्यापक रामदास झोळ यांनी ) दिलेले विषय व योजना बाबत चर्चा झाल्याचे प्राध्यापक रामदास झोळ यांना स्वतः फोन करून सांगितले. या सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची बैठक होऊन शिक्षणामध्ये सुविधेतील समानता राबवण्याचे धोरण ठरले त्यामध्ये बार्टी, सारथी व महाज्योत मधील सर्व योजना /सवलती एकसारख्या करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलाआहे. तसेच उच्च उत्पन्न गटातील पालकांना नॉन क्रिमिलियर ची मर्यादा लावून गरिबांना शैक्षणिक सवलतीचा फायदा व्हावा म्हणून विविध निर्णय घेण्यात आले.
या सर्व शैक्षणिक सुविधेतील समानतेसाठी प्राध्यापक रामदास झोळ यांनी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना जसे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शरदचंद्रजी पवार व जरांगे पाटलांना भेटून याबाबत चर्चा केली होती याला अखेर यश आले असे म्हणता येईल.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…