कावळवाडी प्रतिनिधी. कावळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लोकनेते स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा ग्रामविकास स्वाभिमानी पॅनल माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या पॅनलने विरोधी गटाचा पराभव केला असून बागल पार्टीचे कट्टर समर्थक मकाईचे विद्यमान संचालक रामभाऊ हाके यांच्या मार्गदर्शनाखाली कावळवाडी ग्रामपंचायतीवर एक हाती विजय मिळवलेला आहे .ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंचपदाचे उमेदवार सौ राणी तुषार हाके यांना एकूण 381 मते मिळाली असून 52 मतांची मताधिक्य रामभाऊ हाके यांनी दिलेले आहे. सर्वसामान्य जनतेची निरपेक्ष व प्रामाणिक सेवा केल्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचे रामभाऊ हाके यांनी विजयानंतर सांगितले. वार्ड क्रमांक एक मध्ये प्रतीक शिवाजी शेजाळ १४५ मध्ये सो आशाबाई बुवाजी शेजाळ 141 मध्ये सौ. कलावती विठ्ठल शेजाळ 141 मध्ये विजय शंकरराव हाके पाटील १२४ मध्ये जमुना हाके 128 मध्ये नानासाहेब हाके अल्पशा मतांनी पराभूत झाले असून पूजा मुकेश पावणे 120 मतांनी विजयी झालेले आहेत. एकंदर कावळवाडी ग्रामपंचायत वर बागल पाटील गटाचा झेंडा फडकला असून सत्ता कायम राखण्यात त्यांना यश आले आहे.कावळवाडी ग्रामपंचायत निवडणूकीत भरघोस यश मिळाल्याबद्दल रामभाऊ हाके यांचे अभिनंदन मा.आमदार नारायण आबा पाटील बागलगटाच्या नेत्या सौ.रश्मी दिदी बागल युवा नेते दिग्विजय बागल यांनी नूतन सरपंच सदस्यांचे ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.