Categories: करमाळा

गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे वसू बारस निमित्त मोठ्या उत्साहात गो – मातेची पूजा संप्पन

करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे वसू बारस निमित्त मोठ्या उत्साहात गो – मातेची पूजा करण्यात आली. यावेळेस प्रमुख अतिथी करमाळा तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव त्यांचे सहकारी यांचे सह गोशाळेचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळेस गो – मातेला बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, गूळ याचा नैवेद्य दाखवून मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळेस गोसेवा समितीचे जगदीश जी शिगची यांनी आलेल्या डॉक्टरांचे व सर्व उपस्थित मान्यवरांचे गो – मातेचे महत्व सांगून आभार मानले. यावेळेस बोलताना संस्थेचे अध्यक्ष खाटेर यांनी गोशाळे संदर्भात माहिती दिली व सर्वाना दीपावली च्या शुभेच्छा दिल्या.गोशाळा स्थापन झाल्यापासून गो मातेची सेवा करणारे पोपटराव काळदाते व त्यांचा परिवार यांच्या वतीनेही गोमातेची पूजा करण्यात आली.या वेळेस नगरसेविका संगीता खाटेर, नितीन दोशी, अनिलशेठ सोळंकी,दिनेश मुथा,वैभव दोशी, आशिष बोरा, जीवन संचेती,प्रीतम दोशी,संतोष बन्सीलाल कटारिया, गणेश बोरा,मार्केट कमिटीचे ढाणे, अर्बन बँकेचे कुलकर्णी मॅडम व त्यांचा परिवार,स्पर्श सोळंकी,प्रीतम राठोड, गिरीश शहा, विजय बरीदे, चंद्रकांत काळदाते, ह. भ. प. अमोल महाराज काळदाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago