Categories: करमाळा

मतदार संघातील छत्तीस गावासह करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार. संजयमामा शिंदेंच्या कार्यकर्त्यांची उल्लेखनीय आगेकुच. 2024 ला पुन्हा दिसेल मामांचा जलवा


करमाळा(वार्ता)- करमाळा तालुक्यातील१६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल नुकताच लागला असुन, बहुतांश ग्रामपंचायती शिंदे गट आणि शिंदे गटाबरोबर युती करून लढलेल्या गटाचे कार्यकर्त्याकडे आलेल्या असलेचे चित्र स्पष्ट होत आहे. यामधे आमदार संजयमामा शिंदे यांची ताकद वाढल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आमदार झाल्यापासुन आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदार संघातील जनतेची नाळ कदापिही तुटु दिली नाही. मतदार संघातील प्रत्येक छोटया मोठ्या कार्यकर्त्याचे हाकेला धावुन जाणेचे काम आमदार संजयमामा शिंदे यांनी अतिशय चोखपणे बजावले आहे. वास्तविक २०१९ ला आमदार होण्यापुर्वी असणारे कार्यकर्त्याच्या संख्येत दिवसें दिवस वाढच झालेचे स्पष्ट होत आहे.२०१४ आणि २०१९ पूर्वी आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे गावोगावी कार्यकर्त्याची गर्दी कमी होती, परंतु ही परिस्थिती आज बदललेली दिसुन येत आहे. करमाळा तालुक्यातच 47% टक्के मतदान होण्याचे संकेत मिळत आहेत. आज जेऊरचा अपवाद वगळता घोटी, निंभोरे , केम, केत्तुर, रामवाडी, कंदर, कोर्टी, वीट सह बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायतीत संजयमामा शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने सिध्द झाले आहे. वस्तुतः 2019 ला आमदार झालेनंतर 2020 ला कोरोना ची महामारी आली. त्यानंतर सरकार ची प्रचंड उलथा पालथ यातच जास्त वेळ जरी गेला असला तरी उर्वरीत 1 ते 1/5 वर्षात मामांनी मंजुर केलेली विकासाची कामे
उल्लेखनीय आहेत.*आमदार संजयमामांकडे संयम,जिद्द, चिकाटी, दुरदृष्टी, दृढ-निश्चय* हे गुण असल्यामुळे निश्चितच करमाळा तालुक्यातील अनेक प्रलंबित योजनांना गती मिळाली असुन भविष्यकाळ उज्वल आहे. आपले उद्योग व्यवसायाचे जाळे निर्माण करून आणि सोलापुर जिल्ह्यातील राजकारणात देखिल आपला दबदबा त्यांनी कायम ठेवला आहे हे दिसुन येते. करमाळा तालुक्यातील अनेक गटातटाची आणि वेगवेगळ्या विचारसरणीची असणारी मंडळी एकत्र ठेवण्याचे काम मामांनी यशस्वी केले आहे.2014 पेक्षा आज शिंदे गट प्रचंड वेगाने उभारी घेत असताना आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढत असताना होम टु होम ,माऊथ टु माऊथ संपर्क साधण्याचे कौशल्य मामांनी साधलेले असुन, मामांकडे काम घेऊन जाणाऱ्या माणुस त्या कामाचे तात्काळ उत्तर मिळवुनच येताना दिसतो विशेषतः प्रत्येकाचे कामासाठी मामा स्वतःच फोनवरुन अधिकारी वर्गाला डायरेक्ट संपर्क साधतात आणि कामांचा निपटारा जागेवर करतात हे कौतुकास्पद आहे. करमाळा तालुक्याचे राजकारणात कायमच कार्यकर्त्यांची उलथापालथ चालुच असते त्यामुळे भविष्यकाळात अंतर्गत हेवेदाव्याचे राजकारणातुन कोणी गटात बंडाळी केल्यास समोरून लगेच पर्यायी कार्यकर्ता आपला गट आमदार गटात आणण्यासाठी इच्छुक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताना 47% जनमताचा कौल हा आमदार संजयमामा शिंदे यांचे बाजुने असल्याचे विविध जनमत चाचण्या मधुन दिसुन येत आहे. करमाळा तालुक्यातील संपुर्ण परिसराचा कायापालट होण्यासाठी आमदार संजयमामांनी आखलेले सर्व आराखडे नियोजनबद्ध पद्धतीने मार्गस्थ झाले असुन आपला संपुर्ण तालुका सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री सर्वसामान्यांना झाली आहे. सरकार बदलाचे काळातही करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावताना जाणिवपुर्वक अडथळे आणण्याचे काम बड्या राजकीय मंडळींनी केले तरीही मामांनी कधीच स्वतःचा संयम सुटु दिला नाही. कोणावरही कसलीच टिका टिप्पणी न करता आपले काम यशस्वी करत राहणे यासाठी जो संयम लागतो तो या नेत्याचे अंगी आहे.आजची परिस्थिती उद्या नक्कीच बदलणार हे माहीती असल्यामुळे आपले नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेवरील विश्वास पक्का ठेवुन बाळगलेला संयम आज उपयोगाला येत आहे. करमाळा तालुक्यात आणि जिल्ह्यात निश्चितच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सत्तेत जाण्याने फायदा झाल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. करमाळा तालुक्याला एका अभ्यासु, दृढनिश्चयी , ताकदवान माणसाची उणीव होती ती उणीव निश्चितपणे आमदार. संजयमामा शिंदे यांचे रुपाने भरून आली असुन करमाळा तालुक्याचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल असेल हे नक्की!.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

21 hours ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

2 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

3 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

3 days ago